अक्कलकोट येथे बसव जयंती निमित्त महिला कंडक्टरचां सन्मान.
आजच्या दिनी आम्ही मातृशक्तीचा गौरव केला.

बसव जयंती निमित्त महिला कंडक्टरचां सन्मान.

विश्वगुरू चा उपक्रम

अक्कलकोट दि,२२ अक्कलकोट आगारातील महिला वाहकांचा सन्मान उद्योगपती सुधीर माळशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्षस्थानी विश्वगुरू महात्मा बसवेश्वर साहित्य परिषदेचे अध्यक्ष स्वामीनाथ हरवाळकर हे होते.
यावेळी आपला परिवार सांभाळून अत्यंत अवघड अशी कंडक्टरची नोकरी करणाऱ्या महिलांचा सन्मान लेखन साहित्य, पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ देऊन लिंगायत नेते तथा उद्योगपती सुधीर माळशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना स्वामीनाथ हरवाळकर म्हणाले,अनुभव मंटपाद्वारे जगातील महिलांना प्रथम बोलत करण्याचं काम बसवण्णानी अनुभव मंटपाद्वारे बाराशे वर्षांपूर्वी भारतात केली. म्हणून आजच्या दिनी आम्ही मातृशक्तीचा गौरव केला.
अक्कलकोट आगारातील महिला वाहक अंजना तालीपीठे,आशा हराळे,सुलक्ष्मी गुंजाळ, रेणुका चौधरी,उज्वला कुंबळे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी हनुमंत आगरखेड,श्रीशैल कलशेट्टी,मंगेश सर्वगोड, सोपान इंगळे नागेश कोनापुरे,शरणू अल्लोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

…..
