अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले महाप्रसाद कार्य सकारात्मक ऊर्जा देणारे ; सुप्रसिद्ध हवामान तज्ञ व अभ्यासक पंजाबराव डख
न्यासाचे परिसरात प्रसन्नता

अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले महाप्रसाद कार्य सकारात्मक ऊर्जा देणारे ; सुप्रसिद्ध हवामान तज्ञ व अभ्यासक पंजाबराव डख

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले महाप्रसाद कार्य सकारात्मक ऊर्जा देणारे असून, न्यासाचे परिसरात प्रसन्नता असल्याचे मनोगत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हवामान तज्ञ व अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत स्नेहलोक परिवारातील काका पाटील, पिंटू भासगी हे उपस्थित होते.

याप्रसंगी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, निखिल पाटील, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर शरद भोसले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
