भावी जीवन कारकिर्दीस स्वामींचे आशीर्वाद गरजेचे – कैलास शिंदे
कैलास शिंदे यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/05/IMG-20230502-WA0118-780x470.jpg)
भावी जीवन कारकिर्दीस स्वामींचे आशीर्वाद गरजेचे – कैलास शिंदे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२/५/२३) – आपल्या जीवनातील भावी राजकीय कारकीर्दीस श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद गरजेचे असल्याने आज येथे येऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतलो असल्याचे मनोगत कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते कैलास शिंदे यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेशजी इंगळे यांनी त्यांचा श्रींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.या वेळी शिंदे बोलत होते. पुढे बोलताना शिंदे यांनी आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असल्यामुळे स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अक्कलकोट पुण्यनगरीस हवे तेंव्हा आवश्यक सहकार्य करण्यास आपण तत्पर असल्याचे सांगून मंदिरातील शिस्त, स्वच्छता, व शांततेबद्दल व मंदिर समितीच्या सामाजिक व धार्मिक उपक्रमाबद्दल जाणून घेऊन समितीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – कैलास शिंदे यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)