अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामासाठी 5 कोटी निधी मंजूर-आ सचिनदादा कल्यांणशेट्टी
विविध 60 विकास कामांना 5 कोटी निधी मंजूर करून मुलभूत सुविधा व विकासाला प्राधान्य दिला आहे

अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामासाठी 5 कोटी निधी मंजूर-आ सचिनदादा कल्यांणशेट्टी

अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील विविध मंदिरासमोरील सभामंडप, संरक्षक भिंत, दहन शेड, अंतर्गत सिमेंट रस्ते विकास कामांकरिता ना. श्री. गिरीष महाजन यांच्याकडे केलेल्या मागणी व पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत ना. गिरीषजी महाजन यांनी रु.5 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आमदार श्री सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी दिली.
तालुक्यातील हालहळ्ळी, बक्षीहिप्परगे, मुस्ती, कुंभारी, आंदेवाडी खु., हालचिंचोळी, सुलतानपुर, कल्लकर्जाळ, वरळेगाव, दहिटणेवाडी, संगोगी ब., शावळ, मुगळी, दुधनी, मंगरुळ, चिंचोळी, इटगे, तोळणुर, म्हैसलगे हडपद, नन्हेगांव, शिरवळ, तळेवाडी, गुड्डेवाडी, हत्तीकणबस नंदर्गी, हन्नूर, कडबगांव, किरनळ्ळी, औज, शिंगडगांव, आलेगाव, बर्हाणपुर, मुंढेवाडी, तिल्हेहाळ, चपळगाववाडी, शेगाव, हंद्राळ, डोंबरजवळगे, नाविंदगी, हसापूर, बोरोटी खु., मुळेगाव, नागणसुर, आंदेवाडी, बावकरवाडी, सिंदखेड, कुरनुर, कडबगाव, केगांव, बारोटी, बोरेगांव, वडजी, पिंजरवाडी या गावांना विविध 60 विकास कामांना 5 कोटी निधी मंजूर करून मुलभूत सुविधा व विकासाला प्राधान्य दिला आहे
