सोलापूर काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली सुशीलकुमार शिंदे यांची भेट
सोलापूर काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली सुशीलकुमार शिंदे यांची भेट
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/05/IMG-20230505-WA0063-780x470.jpg)
सोलापूर काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली सुशीलकुमार शिंदे यांची भेट
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
मुंबई- माजी केंद्रीय गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेत्यांनी मुंबईत आज भेट घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून तालुकाध्यक्ष निवडीवरून सोलापूर जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत गदारोळ निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मागील 15 दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नाना पटोले यांना सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री धवलसिंह मोहिते पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रा. काकासाहेब कुलकर्णी, देखरेख व नियंत्रण समितीचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी म्हसवड जिल्हा सातारा येथे भेट घेतली होती त्यानंतर जिल्ह्यातील कामांचा आढावा देऊन चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर आज देशाचे नेते केंद्रीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची आज मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यावर चर्चा करण्यात आली. यावेळी सुशीलकुमार शिंदे बोलताना असं म्हणाले की श्री धवलसिंह मोहिते पाटील यांचं काम उत्तम असून नवे व जुन्यांचा मेळ घालून आपण एकत्रपणे काम करावे असा सल्लाही दिला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा.काकासाहेब कुलकर्णी, सोलापूर जिल्हा देखरेख व नियंत्रण समितीचे अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)