
बेवारस अवस्थेत असलेल्या मनोयात्री ला मिळाला आधार

स्वतःची रुग्णवाहिका नसल्याने आणि निवारा केंद्र नसल्याने होत असलेल्या अडचणींवर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय खरंय पण बेजुबान असलेला मनोयात्री जेंव्हा पळ काढतो तेव्हा मनात अपराधीपणाची भावना येते.
मनोयात्रींसाठी तात्पुरती सोय मिळवण्यासाठीची धावपळ, असो की पुढील उपचारासाठी पोलिसांची पुर्वपरवानगी/कागदपत्रांची पूर्तता मग रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न,

जवळएक चार पाच दिवसांच्या अंतराने सर्व सोय झाल्याने नगरला घेऊन जाण्यासाठी निघालो असता.
मेहबूब सोबत असणाऱ्या मनोयात्रींनी पळ काढला त्याला शोधण्यात नगरला जाणं थांबलं,

तो पळून जाईल असं वाटलं नव्हतं.
सतत त्याच पाठीवर ओरबाडून घेणं मला काळजीत टाकत होतं,पाठीवरच्या रक्ताळलेल्या हार एका रेषात त्याच्या जाणीवा माझ्यात होत्या.हातावरील जख्मेत अडकलेल्या धाग्यादोऱ्यातून तो मुक्त झालेला होता,
ताईत माळाने भरलेल्या गळ्यात तो कित्येक वर्षे बंदिस्त होता.आता मला त्याच्या जख्मांची काळजी वाटते.

तो पळून गेल्याने राहिलेल्या मेहबूब ला उपचारासाठी घेऊन जाणे खूप गरजेचं होतं. बिथरलेल्या अवस्थेत कित्येक वर्षांपासून तो फिरत असे, वाढलेल्या केसांच्या जटात किड्यांनी घर केलेलं कचराकुंडीतून पडलेल्या अन्नाला तो चघळत बसे लवकर उपचार झाल्यास थोड्या प्रमाणात का होईना तो सहिसलामत यातून मार्गस्थ होईल पुढील वाटेला,

ज्यांनी या प्रवासात आमच्या सोबत वाटसरू झाले,
त्या सर्वांचा मी ऋणी आहे
त्यात जोडभावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करणकोट सर,जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगल सर,इथॉसच्या अंजली वाघमारे ताई, स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्राचे समन्वयक रमाकांत दोड्डी सर,डॉक्टर अॅण्ड पेशंट गॅलरीचे ब्रिजेश कासट सर, सोलापूर महानगरपालिका बेघर निवारा केंद्राचे वसीम शेख सर,अशोक वाघमारे सर, रुग्णवाहिका चालक मुकेश आणि ज्यांचे याकामी हात जोडले त्या सर्वांचे आभार
आतिश कविता लक्ष्मण
संभव फाउंडेशन, सोलापूर
९७६५०६५०९८