स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

वटवृक्ष मंदिरात शताब्दी महोत्सवी मासिक किर्तन सेवा स्वामी चरणी अर्पण

महेश इंगळेंच्या हस्ते शताब्दी महोत्सवाचे दीप प्रज्वलन

डोंबिवली बदलापूरकरांची भक्तिमय शताब्दी

HTML img Tag Simply Easy Learning    

वटवृक्ष मंदिरात शताब्दी महोत्सवी मासिक किर्तन सेवा स्वामी चरणी अर्पण.

HTML img Tag Simply Easy Learning    

महेश इंगळेंच्या हस्ते शताब्दी महोत्सवाचे दीप प्रज्वलन

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१५/५/२३) –
डोंबिवली बदलापूर येथील स्वामीभक्त मंडळींच्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भक्तिमय शताब्दी धार्मिक कार्यक्रमांचा शुभारंभ मोठ्या थाटात व भक्तीमय वातावरणात पार पडला. वटवृक्ष मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले. डोंबीवलीतील स्वामी भक्त सद्गुरु चैतन्यस्वरूप अण्णा लिमये यांच्या श्री स्वामी समर्थ नामाचा प्रचार आणि प्रसार या कार्याअंतर्गत जप, नामस्मरण, किर्तन भजन, गायन या सेवेत, अध्यात्मिक उन्नती सोबत स्वामीसेवकांसाठी मनोरंजनाचे हक्काचे व्यासपीठ हे ध्येय समोर ठेवून अक्कलकोट मासिक किर्तन सेवेचे आयोजन डोंबिवली बदलापूर स्वामी भक्त मंडळींचे अध्यक्ष सोमदत्त आसोलकर हे श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोटचे अध्यक्ष सन्माननीय महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आले आहेत. पुर्वजन्माचे काहीतरी ऋणानुबंध आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद असल्यानेच हे सेवा यज्ञकुंड सतत धगधगत आहे. अक्कलकोट स्वामींच्या कालच्या १०० व्या मासिक सेवेदरम्यान स्वामी चरित्र सारामृत अध्याय २१ वर आधारित गाण्यांचा कार्यक्रम श्री किरण फाटक आणि अपुर्व गोखले यांनी वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या ज्योतिबा मंडप येथे सादर केला तसेच या मासिक मे महिन्याचा जप, नामस्मरण, मानसपूजा आणि १०० वी मासिक किर्तन सेवा ही.भ.प.श्री.सुधीर बाळ बुवा यांनी स्वामींचरणी अर्पण केली. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय २१ या ग्रंथाचे पारायण श्रीमंत मृदुलाराजे भोसले मुरलीधर मंदिर, अक्कलकोट येथे संपन्न झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, चंद्रकांत ठाकूर संस्थापक डोंबिवली बदलापूर स्वामीभक्त मंडळी, नित्यानंद घाटे अध्यक्ष श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ डोंबिवली व ह.भ.प. सुधीर बाळ बुवा हे उपस्थित होते.
मानसपुजेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष रहाटे तर शताब्दी महोत्सव कार्यक्रमाच‌‌‌ आयोजन भरत डिंगोरकर यांनी केले होते. या क्रार्यक्रमात त्यांना तबल्यावर सुनील शेलार सर व हार्मोनियम वर मयूर स्वामी, अक्कलकोट व छाया गद्रे यांनी किर्तनकारांना उत्तम साथसंगत केली.
या कार्यक्रमास श्रोत्यांनीही मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, संजय पाठक, आत्माराम तायशेटे, संतोष वाघमोडे, स्वामीनाथ लोणारी, रविराव महिंद्रकर, काशिनाथ इंडे, चंद्रकांत ठाकूर मामा व डोंबीवली बदलापूर स्वामी भक्त मंडळी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button