गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले जिल्हा सरकारी वकील राजपूत यांची कामगिरी!
ठळक :* दोघांना फाशी अन् ९० आरोपींना जन्मठेप
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/05/IMG-20230517-WA0057-720x470.jpg)
गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले जिल्हा सरकारी वकील राजपूत यांची कामगिरी!
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
*ठळक :* दोघांना फाशी अन् ९० आरोपींना जन्मठेप
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
*सोलापूर :* गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरलेले जिल्हा सरकारी वकील म्हणून प्रदीपसिंग राजपूत यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या अचूक युक्तीवादामुळे व उच्च, सर्वोच्च न्यायालयातील न्यायनिवाड्यांच्या सादरीकरणामुळे पाच वर्षांत तब्बल ९० आरोपींना न्यायालयाने जन्मठेप आणि दोघांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
सोलापूर जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील म्हणून
२६ एप्रिल २०१८ रोजी प्रदीपसिंग राजपूत यांना संधी मिळाली. संधीचे सोने करून त्यांनी कायद्याचा अभ्यास करीत अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका चोखपणे बजावली.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
जिल्हा सरकारी वकील म्हणून पाच वर्षांहून अधिक काळ संधी मिळालेले काही मोजकेच वकील आहेत.
त्यात आता प्रदीपसिंग राजपूत यांचीही वर्णी लागली आहे.
खून, खुनाचा प्रयत्न,
अल्पवयीन मुलीवर व महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना शिक्षा होण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
त्यांच्याकडे आलेल्या खटल्यातील बहुतेक आरोपींना कठोर शिक्षा झाली आहे.
गुन्हा कोणताही असो आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटायला नको,
यासाठी त्यांनी नेहमीच जागल्याची भूमिका निभावली आहे.
सोमवारी (ता. १५) शिक्षिका पत्नीचा खून करणाऱ्या तिच्या शिक्षक पतीला जन्मठेप ठोठावण्यात महत्त्वाचा युक्तिवाद न्यायालया केला आणि न्यायालयाने त्या आरोपीला जन्मठेप ठोठावली.
त्याचवेळी ॲड. राजपूत यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील ती नव्वदावी जन्मठेप ठरली.
त्यातून त्यांच्या नावे नवे रेकॉर्ड प्रस्थापित झाले आहे.
*खटल्यांविषयी….*
*- वैराग (ता. बार्शी) पोलिस ठाण्यात दाखल खुनाच्या खटल्यात तब्बल १८ आरोपींना न्यायालयाने जन्मठेप ठोठावली.*
*- माळशिरस तालुक्यातील एका खूनाच्या गुन्ह्यात नऊ जण दोषी ठरले आणि न्यायालयाने त्यांना जन्मठेप ठोठावली होती.*
*- मंद्रूप पोलिस ठाण्याच्या हद्दीत ‘खून का बदला खून’ असा खटला चालला; त्यात चौघांना जन्मठेप लागली.*
*- विडी घरकूलमध्ये पती व त्याच्या प्रेयसीने मिळून पत्नीचा खून करून प्रेत घरासमोर पुरले होते; या गुन्ह्यात चौघांना जन्मठेप झाली.*
*- अल्पवयीन मुलावर अत्याचार करून त्याचा खून करण्यात आला. रेल्वेने प्रेत घेऊन जाणाऱ्यांना पकडले, त्या दोघा पती-पत्नीला जन्मठेप झाली.*