मंद्रूपमध्ये दोन्ही कुंभार गट आले एकत्र चौडेश्वरी यात्रा एकत्रित साजरा करणार
मंद्रूपमध्ये दोन्ही कुंभार गट आले एकत्र चौडेश्वरी यात्रा एकत्रित साजरा करणार
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/05/IMG-20230517-WA0054-780x470.jpg)
मंद्रूपमध्ये दोन्ही कुंभार गट आले एकत्र चौडेश्वरी यात्रा एकत्रित साजरा करणार
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
मंद्रूप,दि.१७
गेल्या अनेक वर्षापासून दोन यात्रा साजरा करणा-या मंद्रूपमधील कुंभार समाजातील दोन गट माजी सभापती गुरूसिद्ध म्हेत्रे व पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांच्या मध्यस्थीने बुधवारी
एकत्र आले. यंदा एकत्रित यात्रा करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
माजी सभापती गुरूसिद्ध म्हेत्रे यांच्या संपर्क कार्यालयात यासंदर्भात बैठक झाली.
यावेळी बोलताना माजी सभापती गुरूसिद्ध म्हेत्रे व पत्रकार पंचाक्षरी स्वामी म्हणाले,कुंभार समाज अल्पसंख्याक असून श्री. चौडेश्वरी देवीची यात्रा वेगवेगळे साजरा करणे योग्य नाही. कुंभार समाजाने एकत्रित येऊन यात्रा साजरा करणे गरजेचे आहे. वैयक्तिक मतभेद व झालेले गैरसमज यापुढे यात्रेत आणू नयेत. तुम्ही सगळे एकमेकांचे नातलग आहात त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येऊन यात्रा साजरा करावेत असे आवाहन केले.
या आवाहनाला कुंभार समाजातील दोन्ही गटाने प्रतिसाद देत यावर्षी एकत्र येऊन एकच यात्रा साजरा करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे यंदाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
या बैठकीला माजी सरपंच पिराप्पा म्हेत्रे, प्रकाश कुंभार (गुरूजी)प्रवीण कुंभार,महादेव गुरण्णा कुंभार,मळसिध्द शिंगडगाव, राजकुमार कुंभार, नागनाथ लोभे, महादेव सिद्धप्पा कुंभार, धर्मण्णा कुंभार,चंद्रकांत प्रभू कुंभार,रवी कुंभार, नागेश कुंभारआदी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
चौकट. ..
आम्ही एकत्र आलो…
यावेळी बोलताना प्रकाश कुंभार-गुरुजी व प्रवीण कुंभार म्हणाले, आम्ही मतभेद विसरून समाजाच्या भल्यासाठी एकत्र आलो असून यंदाची चौडेश्वरी यात्रा भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा करू अशी ग्वाही या दोघांनी यावेळी बोलताना दिली.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)