स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

स्वामी कृपेचे छत्र हे समाधानी जीवनाचे मूलमंत्र -अभिनेता स्वप्निल जोशी

सिने कलाकार स्वप्नील जोशी यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, सिध्दाराम म्हेत्रे व अन्य दिसत आहेत.

स्वामी कृपेचे छत्र हे समाधानी जीवनाचे मूलमंत्र -अभिनेता स्वप्निल जोशी

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.७/६/२३) –

स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांचे पामर भक्त मोठ्या आशेने जीवन जगत असतात. त्यामुळे स्वामीकृपा भक्तांची मनोकामना पूर्णत्वास जाणेकामी लोकांना समाधान देणारी बाब ठरते. अशाप्रकारे सर्व स्वामी भक्तांप्रमाणे माझ्याही मस्तकी स्वामी कृपेचे छत्र असल्याने या छत्रछायेतून आम्हाला भक्ती शक्तीच्या अनुभूतीतून समाधानी जीवन लाभलेले आहे, कारण हे स्वामी कृपेचे छत्र म्हणजे समाधानी जीवनाचे मूलमंत्र असल्याचे मनोगत सुप्रसिद्ध सिनेकलाकार स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे व मा.आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी स्वप्निल जोशी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी सिने कलाकार स्वप्नील जोशी बोलत होते. यापुढे बोलताना त्यांनी वटवृक्ष मंदिरातील नेत्र दीपक सुशोभीकरण पाहून मन प्रसन्न झाले असून येथील रमणीय व भक्तीमय परिसरात ज्या ज्या वेळी स्वामीच्या दर्शनाकरिता येथे येतो त्यावेळी साक्षात स्वामी समर्थांचा सहवास आमच्या आत्म्याशी एकरूप होतो असे मनोगतही व्यक्त करत वटवृक्ष मंदिर समितीच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, विश्वनाथ हडलगी, गिरीश पवार, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर, विपुल जाधव, श्रीकांत मलवे आदींसह स्वामीभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – सिने कलाकार स्वप्नील जोशी यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, सिध्दाराम म्हेत्रे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button