स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य स्वामीभक्ती प्रसार कार्यास दिशा देणारी – आ.चंद्रशेखर बावनकुळे

आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, आ.सुभाष बापू देशमुख, आ.सचिन दादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य स्वामीभक्ती प्रसार कार्यास दिशा देणारी – आ.चंद्रशेखर बावनकुळे

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.७/६/२३) –

HTML img Tag Simply Easy Learning    

अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे हे वटवृक्ष मंदिर म्हणजे या भूतलावरील नंदनवन आहे. स्वामींच्या या नंदनवनास असंख्य भाविक अत्यंत श्रद्धेने भेट देऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होतात. अशा या पावन तीर्थक्षेत्रातील स्वामी समर्थांच्या नंदनवनाची सेवा करण्याचे भाग्य महेश इंगळे यांना लाभले आहे. स्वामी समर्थांनी दिलेली सेवा गोड मानून महेश इंगळे हे अत्यंत समर्पित जीवनशैलीच्या कार्यातून आलेल्या भाविकांची सेवा करतात. मंदिर समितीच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्वामीभक्ती प्रचार प्रसार कार्याची कामे केल्याने भाविकांची स्वामींवरील श्रद्धा दृढ होत चालली आहे. त्यामुळे एका अर्थाने महेश इंगळेंच्या माध्यमातून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी सेवेचे कार्य हे स्वामीभक्ती प्रसार कार्यास दिशा देणारे ठरत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी
आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आ. बावनकुळे बोलत होते. पुढे बोलताना आ. बावनकुळे यांनी अक्कलकोट विकास आराखड्यासंबंधी शासनाने सकारात्मक धोरण अवलंबले असल्याने अक्कलकोट विकास आराखड्यास भरभरून निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अक्कलकोट वटवृक्ष मंदिरासह शहराचा चौफेर विकास होईल. शासनाचे हे विकासाभिमुख धोरण अक्कलकोटचे भविष्य उज्वल करेल.
स्वामीभक्तीच्या या प्रसार कार्यातून महेश इंगळे यांनी अनेक स्वामी भक्तांना स्वामी समर्थांच्या या भक्ती साखळीत जोडून अनेक भाविकांना भक्ती मार्गाची दिशा दाखविली असल्याचे सांगीतले. आपल्याला कोणत्याही कामाप्रती तळमळ असली की आपल्या हातून सर्वोत्कृष्ट कार्य होत राहून जीवनात मोठे यश मिळते. याचे उत्तम उदाहरण देताना आ.बावनकुळे यांनी मी माझ्या जीवनातील राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी विदर्भातील कोराडी महाऔष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटदार म्हणून काम पाहताना अनेक कामगारांना प्रामाणिकपणे मदत करीत गेलो. या माध्यमातून हळूहळू कामगार नेते म्हणून माझी प्रतिमा निर्माण झाली. यातच कामगार आंदोलना प्रसंगी नितीन गडकरींसारख्या मोठ्या हस्तींचे मार्गदर्शन मला लाभत गेले आणि इथूनच माझ्या राजकीय जीवन प्रवासाला सुरुवात होऊन आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यत पोहोचून लोकसेवेची मोठी संधी मिळून मोठे यश लाभलेले आहे. याकरिता स्वामी समर्थांचे आपण ऋणी आहोत असेही मनोगत आ.बावनकुळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना जाता जाता व्यक्त केले. यावेळी आ.सुभाष बापू देशमुख, आ.राजेंद्र राऊत, आ.सचिन दादा कल्याणशेट्टी, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहाजी पवार, महेश हिंडोळे, चेतनसिंह केदार, प्रा.चांगदेव कांबळे, दयानंद बिडवे, प्रकाश पाटील, रवी बिराजदार, सचिन कलबुर्गी, लखन झंपले, नन्नू कोरबू, रवींद्र वाघमोडे, निजप्पा गायकवाड, धनंजय गाढवे, नाविद डांगे, मोहसीन बागवान, आसिफ बेग, विपुल जाधव, संजय पवार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, आ.सुभाष बापू देशमुख, आ.सचिन दादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button