शैक्षणिक घडामोडी

गिरीजा शिंदे नीट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम

के.एल.ई संचलित मंगरूळ प्रशालेचे माजी विद्यार्थींनी गिरिजा शिंदे हिने निट परीक्षेत 720 पैकी 685 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक

गिरीजा शिंदे नीट परीक्षेत जिल्ह्यात प्रथम
। अक्कलकोट, दि. 15 :
येथील के.एल.ई संचलित मंगरूळ प्रशालेचे माजी विद्यार्थींनी गिरिजा शिंदे हिने निट परीक्षेत 720 पैकी 685 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याने तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.
मंगरूळे प्रशालेच्या माजी विद्यार्थींनी गिरीजा शिंदे हिने निट परिक्षेत 720 पैकी 685 गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविले. तर वर्षा प्रचंडे हिने 720 पैकी 536 गुण, नागनाथ कुंभार यांने 720. पैकी 535 गुण मिळवून निट परिक्षेत उत्तीर्ण झाले आहे. या तीन्ही विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित वर्ग शिक्षकांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्काराला उत्तर देताना गिरिजा शिंदे म्हणाली की, शिक्षणामध्ये कोण गरीब कोण श्रीमंत नसतो, अभ्यासातील सातत्यपणा व चिकाटी, कष्ट करण्याची तयारी असल्यास यशाचे शिखर गाटण्यास वेळ लागणार नसल्याचे बोलत होती.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक एन.एस. कदम बोलताना म्हणाले की, गिरीजा शिंदे हिने नेहमीच शाळेची उपस्थिती लावून शिक्षकांनी शिकवलेल्या अध्यापन लक्ष देऊन ऐकणे, आणि वायपट वेळ न घालवता अभ्यास करीत होती. त्याचेच प्रतिफल असून प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी गिरीजा शिंदे हिचा आदर्श घ्यावे असे आवाहन कदम यांनी केले.
या प्रसंगी व्यासपिठावर मुख्याध्यापक एन.एस.कदम, उपमख्याध्याप एम.वाय. पाटील, पर्यवेक्षिका आरती तोळणूरे आदी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थींनीचे पर्यवेक्षीका आरती तोळणूरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशालेचे शिक्षक एम.एम. कळसगोंडा, आर.बी.उमाटे, पी.एम. पाटील, एन.व्ही. दिंडोरे आदी शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अभार जयंत उपासे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button