ग्रामीण भागातील तरुणांनी व्यवसायिक रोजगाराची कास धरावी – महेश इंगळे
हुसेनी वडापाव सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले मनोगत.हुसेनी वडापाव सेंटरचे प्रथमेश इंगळेंच्या हस्ते उद्घाटन.

ग्रामीण भागातील तरुणांनी व्यवसायिक रोजगाराची कास धरावी – महेश इंगळे

हुसेनी वडापाव सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले मनोगत.हुसेनी वडापाव सेंटरचे प्रथमेश इंगळेंच्या हस्ते उद्घाटन.

(अक्कलकोट, दि.२६/६/२३) (श्री.गवंडी)

आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील अनेक तरुण उच्च शिक्षणापासून वंचित राहतात, कारण वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक तरुण व्यवसायिक शिक्षण घेऊन सुद्धा बेरोजगार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांनी शिक्षणानंतर नोकरीची संधी उपलब्ध झाली नाही तरी हताश न होता विविध उद्योगधंद्यांच्या माध्यमातून व्यवसायिक रोजगाराची कास धरावी असे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व स्विमिंग ग्रुपचे संस्थापक महेश इंगळे यांनी केले.
आज हसापूर येथील हुसेन शेख यांच्या
सोलापूर-गाणगापूर रस्त्याच्या हसापूर रोडवरील पुलालगत हुसेनी वडापाव सेंटरचे उद्घाटन व शुभारंभ स्विमिंग ग्रुपचे संस्थापक व श्री वटवृक्ष महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमेश इंगळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते. पुढे बोलताना महेश इंगळे यांनी महामार्ग लगत शेख यांनी या वडापाव सेंटरची उभारणी करून परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या प्रेरणेतून ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योग धंद्याच्या माध्यमातून व्यवसायिक रोजगाराची कास धरावी असेही प्रतिपादन महेश इंगळे यांनी व्यक्त केले. यावेळी महेश इंगळे मित्र परिवार हसापूरचे राजकुमार कामाठी, गौतम घटकांबळे, महेश कामाठी, परमेश्वर कामाठी, अभय जाधव, रोहित जाधव, अभिषेक कामाठी, अतुल फणसे, स्विमिंग ग्रुपचे सदस्य प्रथमेश इंगळे, बाळासाहेब एकबोटे, संतोष पराणे, राजू एकबोटे, श्रीकांत झिपरे, अरविंद पाटील, बाबा सुरवसे, सचिन किरनळ्ळी, शैलेश राठोड, प्रसन्न हत्ते, सुनील पवार, अमर पाटील, अरविंद पाटील, श्रीशैल गवंडी
आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ – हुसेनी वडापाव सेंटरचे उद्घाटन करताना प्रथमेश इंगळे, महेश इंगळे, संतोष पराणे व अन्य दिसत आहेत.
