ठाणेकरांचे अन्नछत्र मंडळ हे श्रद्धास्थान स्वामी कार्य उल्लेखनीय असून,न्यासाच्या परिसरातील स्वच्छता, नम्रसेवा व व्यवस्थापन उत्तम आहे; खासदार डॉ.श्रीकांत शिंदे
पत्नी सौ.वृषालीताई श्रीकांत शिंदे, विपुल कदम, स्वीय साहय्यक प्राजक्ता जावरे पाटील, कोस्तूभ जोशी, हे उपस्थित होते.

आम्हा ठाणेकरांचे अन्नछत्र मंडळ हे श्रद्धास्थान स्वामी कार्य उल्लेखनीय असून,न्यासाच्या परिसरातील स्वच्छता, नम्रसेवा व व्यवस्थापन उत्तम आहे; खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

अक्कलकोट : (प्रतिनिधी)श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले स्वामी कार्य उल्लेखनीय असून, न्यासाच्या परिसरातील स्वच्छता, नम्रसेवा व व्यवस्थापन उत्तम आहे. आम्हा ठाणेकरांचे अन्नछत्र मंडळ हे श्रद्धास्थान असल्याचे मनोगत राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत पत्नी सौ.वृषालीताई श्रीकांत शिंदे, विपुल कदम, स्वीय साहय्यक प्राजक्ता जावरे पाटील, कोस्तूभ जोशी, हे उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे, तालुका प्रमुख संजय देशमुख, सो.म.पा. माजी नगरसेवक मनोज शेजवाल, शहर प्रमुख योगेश पवार, डॉ.बसवराज बिराजदार, उमेश पांढरे, विनोद मदने व मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, पुरोहित अप्पू पुजारी, अमित थोरात, रोहन शिर्के, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, निखिल पाटील, प्रसाद हुल्ले, विराज माणिकशेट्टी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, सुराज्य घाडगे, महादेव अनगले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
