श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गुरूपौर्णिमे निमित्त धार्मिक कार्यक्रम नामस्मरण,जप व श्री गुरूपूजा महानवैद्य सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील,आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे हस्ते होणार

माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गुरूपौर्णिमे निमित्त धार्मिक कार्यक्रम नामस्मरण,जप व श्री गुरूपूजा महानवैद्य सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील,आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे हस्ते होणार

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट : (प्रतिनिधी)

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक ३ जुलै रोजी गुरूपौर्णिमे निमित्त सकाळी ७ ते ९ श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वाजता महानवैद्य सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, संजय शिंदे (पालखी संयोजक लांजा), अशोक बांदल (देणगीदार, खेड शिवापूर, पुणे) यांच्या हस्ते होणार असल्याचे माहिती न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी दिले.

HTML img Tag Simply Easy Learning    

सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद, दु. ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात अतुल बेहरे पुणे यांच्या नांदब्रम्ह या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ पुणेचे उद्योगपती विशाल गोखले, श्री शंकर महाराज मठ, पुणे विश्वस्त व ग्रँव्हीटी ग्रुपचे चेअरमन मिहीर कुलकर्णी, जगन्नात उर्फ अण्णा थोरात –अध्यक्ष अखिल मंडई मंडळ पुणे, बाळासाहेब दाभेकर –अध्यक्ष भरत मित्र मंडळ पुणे,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. मा.स्थायी समिती चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा.मा.शिक्षण सभापती संकेत पिसे यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

गुरुपोर्णिमे निमित्त लाखो स्वामी भक्तांकरिता अन्नछत्र मंडळ सज्ज असून, उभी स्वामींची मुर्ती, महाप्रसादगृह, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, वाटिका व बालोउद्यान, शिवचरित्र धातू शिल्प प्रदर्शन हे पाहण्यासाठी स्वामी भक्तांची मोठी सोय करण्यात आली आहे. यात्री निवास, यात्री भुवन, प्रशस्त वहानतळ स्वामी भक्तांनी गजबजलेले व फुलून गेले आहे. दरम्यान दि. १ जुलै ते ३ जुलैपर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. न्यासाकडून अग्निशामक व रुग्णवाहिकेचा देखील उत्तम सोय केलेली आहे. न्यासाला देणगीदारास आयकरात ८० – जी कलमान्वे सवलत आहे

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button