भारतीय स्टेट बँक वागदरी शाखेच्या ६८ व्या वर्धापनदिन निमित्त जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट…
शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, ऑनलाईन शिक्षणाची गरज, डिजिटल शाळा व मुलांना संगणकाची आवड निर्माण व्हावी, या सर्व बाबींचा विचार करून शाळेमध्ये संगणक असणे गरजेचे आहे. भारतीय स्टेट बँक वतीने छोटीशी भेट

भारतीय स्टेट बँक वागदरी शाखेच्या ६८ व्या वर्धापनदिन निमित्त जिल्हा परिषद शाळेला संगणक संच भेट…


वागदरी — भारतीय स्टेट बँक वागदरी शाखेच्या ६८ व्या वर्धापनदिन निमित्ताने व शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री शिवशरणप्पा सुरवसे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुला मुलींची शाळा वागदरी, कन्नड शाळां तसेच जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा भुरीकवटे या सर्व शाळेस कॉम्प्युटर संच भेट देण्यात आले.

शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळावे, ऑनलाईन शिक्षणाची गरज, डिजिटल शाळा व मुलांना संगणकाची आवड निर्माण व्हावी, या सर्व बाबींचा विचार करून शाळेमध्ये संगणक असणे गरजेचे आहे. भारतीय स्टेट बँक वतीने छोटीशी भेट देत आहे असे शाखेचे मॅनेजर श्री अरविंद कुमार म्हणाले.,

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री राजकुमार यादव हे होते.सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाखेचे मॅनेजर श्री अरविंद कुमार व कॅशियर प्रवीण बेरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी शाळेतर्फे व शाळा व्यवस्थापन समिती मार्फत उपस्थित मान्यवराचा यथोचित असा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. त्याप्रसंगी भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर अरविंद कुमार साहेब कॅशियर प्रवीण बेरे ,राजकुमार यादव ,भुरीकवटे येथील सामाजिक कार्यकर्ते शाबुदीन शेख ,धानलिंग सलगरे, सुनिल श्रीगण ,संजय चौगुले, व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श शिवशरणप्पा सुरवसे,मुख्याध्यापक सौ अर्चना गिरी, मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक सौ रेखा सोनकवडे कन्नड व भुरीकवटे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवर्ग पालक विद्यार्थी उपस्थित होते.
