श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

स्वामी समर्थ भक्त मंडळ,निपाणी प्रस्तुत ‘सूर भक्तीचे उमटले भक्ती संगीत कार्यक्रमास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव 2023

स्वामी समर्थ भक्त मंडळ,निपाणी प्रस्तुत ‘सूर भक्तीचे उमटले भक्ती संगीत कार्यक्रमास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव

श्री स्वामी समर्थ..! जय जय स्वामी समर्थ..!!, विठ्ठल..! विठ्ठल..!!, देशभक्तीपर, भक्ती व भावगीतासह चित्रपटातील मराठी-हिंदी गीते श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सूर भक्तीचे उमटले भक्ती संगीत ह्या कार्यक्रमास प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३६ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, रविवार सायंकाळी ७ वा. श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ, निपाणी प्रस्तुत ‘सूर भक्तीचे उमटले भक्ती संगीत ह्या कार्यक्रमाने १० वे पुष्प संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी, विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता संजीवकुमार म्हेत्रे, संजय कुलकर्णी, जि.एस.टी. पुणे अधीक्षक हर्षदीप के. प्रयाग, सामाजिक कार्यकर्ते अंकुश चौगुले, चंद्रशेखर मडीखांबे, सुनील खवळे, लखन झंपले, फैजअहमद (नन्नु) कोरबू, जावेद पटेल, डॉ.विनायक गुधले, व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे, पुणेचे उद्योजक संदीप फुगे-पाटील, भारतमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांसह कलाकारांचा न्यासाच्या वतीने प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले. याप्रसंगी भरत मित्र मंडळ पुणे, अध्यक्ष बाळासाहेब धाबेकर हे देखील उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई भोसले, अनुया फुगे-पाटील, अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, क्रांती वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, अँड.संतोष खोबरे, ओंकारेश्वर उटगे मनोज निकम, प्रथमेश इंगळे, स्वामीराव मोरे, योगेश पवार, रोहित खोबरे, श्रीकांत मलवे, अतिश पवार, राजु नवले, सागर गोंडाळ, पिटू शिंदे, निखील पाटील, प्रवीण घाटगे, गोटू माने, अमित थोरात, किरण पाटील, बाळासाहेब घाटगे, बाळासाहेब पोळ, अरविंद शिंदे, प्रथमेश पवार, श्रीशैल कुंभार, अप्पू कलबुर्गी, सौरभ मोरे, वैभव मोरे, राहुल इंडे, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, महादेव अनगले, सनी सोनटक्के व राजेंद्र पवार, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, प्रसन्न बिराजदार, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, अनिल बिराजदार, शरद भोसले, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, धानप्पा उमदी, देवानंद अस्वले, पिंटू दोडमनी, शितल जाधव, श्रीधर गुरव, सचिन मोटे, रवी मोटे, आनंद मोटे, सचिन मोरे, श्रीधर गुरव, पिंटू सूर्यवंशी, प्रा.शरणप्पा अचलेर, प्रज्योत अचलेर,आशिष जाधव, रितेश शहा, प्रतिक शहा, आनंद चौगुले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले.

चौकट :
गुणीजन गौरव :
उत्कृष्ठ सूत्रसंचालन –श्वेताताई हुल्ले, मिडिया नियोजन –प्रशांत भगरे, सोमशेखर जमशेट्टी, स्टेज नियोजन – स्थापत्य अभियंता अमित थोरात, गुणवंत विद्यार्थी सत्कार व उत्कृष्ठ नियोजन – अरविंद शिंदे, संगणक ऑपरेटर- प्रसाद हुल्ले, मुख्य सुरक्षा रक्षक – महादेव अनगले, सह.मुख्य सुरक्षा रक्षक – अनिल गवळी, मंडप कॉनट्रक्टर – राऊत, स्क्रिन ऑपरेटर – कोल्हापुरे, साउंड ऑपरेटर – संदीप सरवदे, लाईट ऑपरेटर – जोगदंड, फोटोग्राफी – ज्ञानेश्वर भोसले, मंडप नियोजन – कल्लप्पा छकडे यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

चौकट :
गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

चौकट :
गुरूपौर्णिमे निमित्त सोमवार दिनांक ३ जुलै रोजी सकाळी ७ ते ९ पर्यंत श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण, सकाळी ९ ते १० पर्यंत नामस्मरण, जप व श्री गुरूपूजा, सकाळी १० वाजता महानवैद्य सोलापूरचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, संजय शिंदे (पालखी संयोजक लांजा), अशोक बांदल (देणगीदार, खेड शिवापूर, पुणे) यांच्या हस्ते दाखविण्यात येणार आहे.

सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व स्वामी भक्तांना महाप्रसाद, दु. ४ वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी, आणि न्यासाच्या सुशोभित केलेल्या रथाच्या मिरवणूकीचा दिंड्या व वाद्यांचा गजरात अतुल बेहरे पुणे यांच्या नांदब्रम्ह या ढोलपथकाच्या तालात आणि अमोलराजे लेझिम संघाच्या शानदार खेळाने शुभारंभ पुणेचे उद्योगपती विशाल गोखले, श्री शंकर महाराज मठ, पुणे विश्वस्त व ग्रँव्हीटी ग्रुपचे चेअरमन मिहीर कुलकर्णी, जगन्नात उर्फ अण्णा थोरात –अध्यक्ष अखिल मंडई मंडळ पुणे, बाळासाहेब दाभेकर –अध्यक्ष भरत मित्र मंडळ पुणे,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शहाजीराजे पवार, सो.म.पा. नगरसेवक व शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, सो.म.पा. मा.स्थायी समिती चेअरमन व शहर-जिल्हाध्यक्ष (कॉंग्रेस) चेतन नरोटे, सो.म.पा. माजी उपमहापौर दिलीप (भाऊ) कोल्हे, सो.म.पा.मा.शिक्षण सभापती संकेत पिसे यांच्या हस्ते पालखी व रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button