श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने १०१ प्रभू श्रीरामचंद्रांचे १०१ मुर्ती वाटप.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तींचे वाटप करताना मान्यवर व श्रीराम बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी दिसत आहेत.

श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने १०१ प्रभू श्रीरामचंद्रांचे १०१ मुर्ती वाटप.


(श्रीशैल गवंडी, दि.२३/०३/२०२५) अ.कोट येथील श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश विठ्ठल लोणारी (कोळी) यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील गावांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या १०१ मुर्तींचे वाटप करण्यात आले. हा मुर्ती वाटप सोहळा येथील प्रियदर्शनी कार्यालयात संपन्न झाला. हा मुर्ती वाटप सोहळा या कार्यक्रमास दिव्य सान्निध्य लाभलेले विरक्त मठाचे म.नि.प्र.बसवलिंग महास्वामीजी, समाधी मठाचे वे.शा.सं.अण्णू महाराज, कुरनूरचे प.पू.आबा महाराज यांच्या हस्ते तसेच सोलापूर मध्य चे आमदार देवेंद्र दादा कोठे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे चिरंजीव प्रथमेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, माजी नगरसेवक मिलन दादा कल्याणशेट्टी, माजी उपनगराध्यक्ष दिलीप भाऊ सिध्दे, माजी उपनगराध्यक्ष यशवंत तात्या धोंगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख, माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे, आरपीआय तालुका अध्यक्ष अविनाश
मडीखांबे, उद्योगपती विलास कोरे, सोलापूरचे नगरसेवक गुरुशांत दादा धुत्तरगांवकर, कोळी महासंघ युवा आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विश्वनाथ प्याटी, उद्योजक स्वामीनाथ हिप्परगी, आपुलकी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष उद्योगपती विशाल राठोड, ज्येष्ठ स्वयंसेवक गुरुलिंग यळमेली, शिवप्रेमी तम्मा मामा शेळके, मल्लम्मा पसारे मॅडम, सुरेखा होळीकट्टी, आरती काळे मॅडम, समर्थ नगर ग्रामपंचायतचे सरपंच जयश्री पाटील, माजी मुख्याध्यापिका उषा हंचाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत एक गाव एक मूर्ती हा धेय उराशी बाळगून तालुक्यातील प्रत्येक गावाला प्रभू श्री रामचंद्रांची एक मूर्ती भेट देण्यात आली. याप्रसंगी बोलताना कोळी महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुणभाऊ लोणारी (कोळी) यांनी माझे आई वडील
विठ्ठल-लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने व त्यांनी दिलेल्या संस्कारातून घडलेल्या जीवननामक कुंचल्यातून तसेच कोळी समाजाचे आद्य कवी कुलगुरू रामायणकार महर्षी वाल्मिकी महाराज यांच्या प्रेरणेतून प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा करणे हे आमच्या लोणारी (कोळी) परिवाराचे प्राथमिक कर्तव्य आहे. या उद्देशाने माझे बंधू ऋषिकेश लोणारी (कोळी) यांनी प्रभू श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेची स्थापना करून आजपर्यंत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या सेवेत अनेक उपक्रम राबविले आहेत. आता अयोध्येत श्रीराम मंदिराची स्थापना होऊन प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्याने सर्व भारतीयांसह आम्हा लोणारी (कोळी) कुटुंबीयांनाही विशेष आनंद झालेला आहे. याच प्रेरणेतून आमच्या श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने यंदाचा श्रीराम नवमी सोहळा तालुक्यात सगळीकडेच जल्लोषात साजरा व्हावा या उद्देशाने श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने एक गाव एक मूर्ती वाटप हा उपक्रम आज येथे राबवून तालुक्यातील प्रत्येक गावाकरिता प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तींचे वाटप करण्यात आले असल्याचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांचा श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने लोणारी (कोळी) परिवार व सर्व श्रीराम भक्तांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रभू श्रीरामचंद्रांचे मूर्तिकार मल्लिकार्जुन कुंभार, अक्षय सोमवंशी, संतोष सुतार यांचाही लोणारी (कोळी) परिवार व श्रीराम भक्तांच्या वतीने तसेच श्रीराम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराम संस्थेचे कार्यकर्ते संतोष वगाले सर, संदीप कटकधोंड, सौरभ हळके, राहूल वाडे, शिवराज तडवळकर, अजय साखरे, श्रीशैल रोडगे, विजय लांडगे, दशरथ मोलीमनी, सागर दळवी, विश्वास शिंदे, वैभव जाधव, काशिनाथ सोलनकर, कार्तिक जाधव, राजकुमार कोळी इत्यादीसह शहर
व तालुक्यातील श्रीराम भक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शशिकांत वसंतपुरे सर यांनी केले तर आभार राजकुमार कोळी यांनी मानले.


फोटो ओळ – प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तींचे वाटप करताना मान्यवर व श्रीराम बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी दिसत आहेत.
