स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

अधिक मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन – महेश इंगळे

स्वामी दर्शनासोबतच धार्मिक कार्यक्रमांचाही लाभ घेण्याचे महेश इंगळेंनी केले आवाहन.

अधिक मासानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन – महेश इंगळे

स्वामी दर्शनासोबतच धार्मिक कार्यक्रमांचाही लाभ घेण्याचे महेश इंगळेंनी केले आवाहन.

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१४/७/२०२३)

– यंदाच्या अधिक श्रावण मासानिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. अधिक मासात दिनांक १८ जुलै ते २० जुलै २०२३ अखेर सोलापूर येथील वारकरी सांप्रदायचे ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज यांची ३ दिवसीय भागवत कथा, दिनांक १७ जुलै ते २३ जुलै अखेर बदलापूर येथील स्वामीभक्त ठाकूर मामा व सहकाऱ्यांचे भक्तनिवास हॉलमध्ये श्री गुरुलिलामृत पारायण सप्ताह, दिनांक २२ जुलै रोजी मुंबई येथील डॉ. प्रफुल्ल विजयकर, डॉ.अपर्णा सामळ, सहकाऱ्यांचे देवस्थानच्या गाणगापूर रोडवरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात २० वर्षाखालील मतिमंद गतिमंद मुलांसाठी होप फॉर होपलेस होमिओपॅथिक शिबिर, दिनांक २५ जुलै ते २७ जुलै अखेर श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात बदलापूर येथील प्रसाद गुरुजी व सहकाऱ्यांचा दत्तयाग, दिनांक २८ जुलै ते १ ऑगस्ट अखेर ह.भ.प.किशोर महाराज शिवणीकर यांची वटवृक्ष मंदिरात संगीत संत चरित्र कथा इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी यंदा दिनांक
१८ जुलैपासून अधिक श्रावण महिना सुरु होत आहे. खरे तर अधिक महीना ही अगदी साधी खगोलीय तरतूद आहे. इंग्रजी सौर वर्ष हे ३६५ दिवसांचे तर आपल्या हिंदू संस्कृतीतील चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे असते. दरवर्षी हा फरक ११ दिवसांचा असतो. दर तीन वर्षांनी हा फरक ३३ दिवसांचा होत असल्याने तो दूर करण्यासाठी १ अधिक मास येतो. तीन वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्याचे महत्व, व्रते, दानधर्म, देवदर्शन करुन आपण मोलाचे बनवून वृद्धींगत करतोच. भाविकांनी व्रत, दानधर्म, स्वामी दर्शन यासह या धार्मिक कार्यक्रमांचाही लाभ घ्यावा असे आवाहन महेश इंगळे यांनी याप्रसंगी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button