निवड /नियुक्ती

हर्षल आकुडे यांची UPSC मार्फत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात IIS पदी निवड

सोलापूरचे सुपुत्र पत्रकार हर्षल आकुडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात (MIB) निवड करण्यात आली आहे.

हर्षल आकुडे यांची UPSC मार्फत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात IIS पदी निवड

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूरचे सुपुत्र पत्रकार हर्षल आकुडे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयात (MIB) निवड करण्यात आली आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयातील भारतीय माहिती सेवेत (IIS) सिनिअर ग्रेड गॅझेटेड ऑफिसर पदाकरिता मराठी भाषेसाठी हर्षल आकुडे यांची निवड करण्यात आली.
या पदासाठीच्या मुलाखती मार्च महिन्यात दिल्ली येथील UPSC भवन येथे घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल गुरुवारी (13 जुलै) रोजी सकाळी जाहीर करण्यात आला आहे.
हर्षल आकुडे हे सध्या नवी दिल्ली येथे बीबीसी न्यूज मराठीमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत.
हर्षल आकुडे यांचं पत्रकारितेचं शिक्षण सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभाग तसंच पुणे विद्यापीठात घेतलेलं आहे. तर, त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण D.B.F दयानंद महाविद्यालय येथे आणि शालेय शिक्षण विद्यानिकेतन प्रशाला, सोलापूर येथून पूर्ण झालं.
हर्षल आकुडे यांना सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरु डॉ.गौतम कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
हर्षल आकुडे यांना त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचे विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर, सहायक डॉ. अंबादास भासके, डॉ.तेजस्विनी कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत हर्षल आकुडे यांनी मिळवलेल्या या यशाचे सोलापुरात सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button