आजपासून भक्तनिवास मध्ये गुरुलिलामृत पारायण सप्ताह सोहळा व सप्ताह उपासना
स्वामी भक्तांना या पारायण सेवेत सहभागी होऊन श्री चरणी सेवा रुजू करायची असेल त्या स्वामी भक्तांनी 99 70 785 296 सौ. ठाकूर मामी यांच्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावे असे आवाहन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.

आजपासून भक्तनिवास मध्ये गुरुलिलामृत पारायण सप्ताह सोहळा व सप्ताह उपासना

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१७/७/२३) –


श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व डोंबिवली बदलापूर स्वामीभक्त मंडळीकृत चंद्रकांत ठाकूर मामा यांच्या संयुक्त विद्यमाने अधिक मासानिमित्त आज दिनांक १७ जुलै ते २३ जुलै २०२३ अखेर श्री स्वामी समर्थांच्या अवतार कार्यावर आधारित असलेल्या ५४ अध्यायाच्या श्री गुरुलिलामृत पोथी पारायणाचे आयोजन देवस्थानच्या भक्त निवास हॉल मध्ये करण्यात आलेले आहे. या सप्ताहात दिनांक १७ जुलै ते २३ जुलै अखेर सकाळी ६ ते ६:३० या वेळेत स्वामी समर्थांची आरती ६:३० ते ११:३० या वेळेत गुरूनीलामृत ग्रंथाचे पारायण सकाळी ११:३० ते १२ नैवेद्य आरती, दुपारी १२:३० ते १:३० महाप्रसाद सायंकाळी ५ ते ७ भजन, कीर्तन, भक्ती संगीत, प्रवचन, ७ ते ७ :३० प्रार्थना नामस्मरण, सायंकाळी ७:३० ते ८ नैवेद्य व आरती, व रात्री ८ ते ९ महाप्रसाद अशाप्रकारे गुरुलिनामृत पारायण सप्ताहाचे नियोजन करण्यात आलेले आहे. वरील सर्व कार्यक्रम वेळेवर सुरू होतील. तरी ज्या स्वामी भक्तांना या पारायण सेवेत सहभागी होऊन श्री चरणी सेवा रुजू करायची असेल त्या स्वामी भक्तांनी 99 70 785 296 सौ. ठाकूर मामी यांच्या या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावे असे आवाहन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
