
खेडगी महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा.


अक्कलकोट,
सध्याच्या धावपळीच्या जीवनात समाजबांधणी व कुटुंब उभारणीत महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन वडाळा येथील माऊली महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. सुवर्णा गुंड यांनी केले.

येथील सी.बी. खेडगी महाविदयालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात डॉ. गुंड प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा तथा संस्थेचे ज्येष्ठ संचालिका शोभाताई खेडगी हे होत्या. व्यासपीठावर संचालिका ज्योती धरणे,
प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट, नॅक समितीचे प्रमुख प्रा. संध्या परांजपे,
पदार्थविज्ञान विभाग प्रमुख तथा लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या समन्वयक जयश्री बिराजदार उपस्थित
होते.

डॉ. सुवर्णा गुंड पुढे म्हणाल्या की,
प्रत्येकाच्या आयुष्यात महिलांना अतिशय महत्वाचे स्थान आहे. महिलांशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, सिंधुताई सकपाळ, मदर तेरेसा, राजमाता जिजाऊ अशा अनेक कर्तृत्ववान महिलांनी अनंत अडचणींचा सामना करत कर्तृत्व गाजवले. समाजामध्ये आज महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. परंतु आजही आपल्या समाजामध्ये स्त्रियांना दुर्लक्षित केले जाते.गेल्या अनेक शतकांपासून महिला आपल्या हक्कांसाठी आणि सन्मानासाठी लढत आहेत. ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे.
कुटुंब व समाजाच्या विकासात् स्त्रीयांचे मोलाचे योगदान असल्याचे गुंड यांनी सांगितले.

प्रास्ताविक भाषण जयश्री बिराजदार यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.
सूत्रसंचालन गायत्री रामपूरे व नलिनी शिंदे यांनी केले. तर
एन.एस.एस. चे समन्वयक सिध्दाराम पाटील यांनी आभार मानले.