माधवराव पाटील महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश विविध उपक्रमाने साजरा
अमृत कलश सुरेश खरात यांना सुपूर्द करताना डॉ. अशोक सपाटे, सतिश शेळके, महेश मोटे, प्रतापसिंग राजपूत, शिला स्वामी व अन्य.

माधवराव पाटील महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश विविध उपक्रमाने साजरा मुरूम, ता. उमरगा, ता. १६ (प्रतिनिधी) : येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने ‘ मेरी माटी मेरा देश ‘अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी स्वयंसेवकामार्फत मुरूम परिसरातील माती गोळा करून एका कलशामध्ये मुरूम सञ्जाचे तलाठी सुरेश खरात यांच्याकडे सोमवारी (ता. १४) रोजी सुपूर्द करण्यात आला. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, प्रा. डॉ. सतिश शेळके, माजी सेवानिवृत्त प्राचार्य काशिनाथ मिरगाळे, महाअंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे, डॉ. शिला स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दीपप्रज्वलित करण्यात आले. यावेळी अमृत कलश घेऊन रॅली काढण्यात येवून महाविद्यालयाचा परिसर स्वयंसेवकांनी स्वच्छ करून घेतला. डॉ. सायबण्णा घोडके, प्रा. दिनकर बिराजदार, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. शिवपुत्र कनाडे, प्रा. डॉ. भिलसिंग जाधव, सुरेखा पाटील, सतिश जाधव आदींनी पुढाकार घेतला. या अभियानात प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने अमृत कलश सुरेश खरात यांना सुपूर्द करताना डॉ. अशोक सपाटे, सतिश शेळके, महेश मोटे, प्रतापसिंग राजपूत, शिला स्वामी व अन्य.
