महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे शासकीय रुग्णालयास व्हीलचेअर भेट…
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे शासकीय रुग्णालयास व्हीलचेअर भेट...
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे शासकीय रुग्णालयास व्हीलचेअर भेट…
भारतीय जनता पक्ष शहर उत्तर विधानसभेतर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयास व्हीलचेअर भेट देण्यात आल्या. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी हा उपक्रम राबविण्यात आला.
छत्रपती श्री शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या बी ब्लॉकमध्ये या व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाभिमुख नेतृत्व आहे त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला हीच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी भेट ठरली आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हजारो रुग्ण शहर आणि जिल्हा परिसरातून येतात. त्यांच्या सोयीसाठी ह्या व्हीलचेअर उपयुक्त ठरणार आहेत.
याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, छत्रपती श्री शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विठ्ठल धडके, शल्यचिकित्सा शास्त्र विभागप्रमुख डॉ. ऋत्विक जयकर, स्त्रीरोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. विद्या तिरंकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. रामेश्वर डावकर, माजी सभागृह नेते संजय कोळी, शहर उत्तर सहप्रभारी राजकुमार पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष गणेश साखरे, प्रसाद कुलकर्णी, राजाभाऊ काकडे, सतिश महाले, बाबूराव जमादार, नागेश येळमेली, अजित गादेकर, बसवराज गंदगे, प्रेम भोगडे, गणेश सुरवसे, शिवकुमार कामाठी, राम वाकसे, अभियंता अमित गुंगे, ॲड. साखरे आदींसह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.