यशोगाथा — डॉ प्रसाद काशिनाथ तानवडे ; वाटचाल संघर्षातून समृद्धीचा प्रवास शिरवळ ते कोल्हापूर व्हाया पुणे – सोलापूर – मुंबई..
वारसा जनसेवक स्व आमदार बाबासाहेब तानवडे यांचा .... जनतेच्या सदैव सेवेचा

यशोगाथा — डॉ प्रसाद काशिनाथ तानवडे ; वाटचाल संघर्षातून समृद्धीचा प्रवास शिरवळ ते कोल्हापूर व्हाया पुणे – सोलापूर – मुंबई..

वारसा जनसेवक स्व आमदार बाबासाहेब तानवडे यांचा …. जनतेच्या सदैव सेवेचा

वाटचाल संघर्षातून समृद्धीचा प्रवास शिरवळ ते कोल्हापूर व्हाया पुणे – सोलापूर – मुंबई

ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन भूमी, अक्कलकोट तालुक्यातील ग्रामदैवत श्री पंचलिगेश्वराचे जागृत स्थान, शिरवळ या गावाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अनेक व्यक्तिमत्व दिले आहेत आणि ते प्रत्येक व्यक्ती आपले सामाजिक दायित्व प्रामाणिकपणे पुर्ण करत आहे.
विशेषत शिरवळ गावची ओळख जनसेवक स्व आमदार बाबासाहेब तानवडे यांच्यामुळे सोलापूर जिल्हात प्रसिद्धीस आले आहे .
अश्याच जनसेवेचे व्रत स्विकारलेले तानवडे घराण्यातील सुपुत्र, अक्कलकोट येथील कापसे परिवाराचे नातू डॉ प्रसाद काशिनाथ तानवडे यांचा वैद्यकीय सेवेतील रुग्णसेवेचा प्रवास प्रेरणादायी …💗🌹

डॉ प्रसाद काशिनाथ तानवडे यांचा जन्म सौ निर्मला व श्री काशिनाथ तानवडे यांच्या पोटी शिरवळ, ता अक्कलकोट जि सोलापूर येथे झाला. पुणे येथे इ. १० वी मध्ये पुणे बोर्डात गुणवत्ता यादीत १६ वा क्रमांक मिळवुन लहानपणीच कुशाग्र बुद्धीमत्तेची चुनुक दाखवली . इ. १२ वी फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण झाले आणि एमबीबीएस साठी डॉ वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे प्रवेश घेऊन वैद्यकीय शिक्षण पुर्ण केले आणि पुढील उच्चशिक्षणासाठी (एम डी –रेडिएशन) शिक्षणासाठी टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई येथे प्रवेश घेतला आणि गोल्ड मेडल मिळवले आहे त्याचप्रमाणे डॉ प्रसाद काशिनाथ तानवडे यांनी ESMO, POCR, CEPC & MBA असे विविध क्षेत्रातील कौशल्यवान शिक्षण पुर्ण केले आहे. आणि मागिल ९ वर्षांपासून एप्पल कॅन्सर हाॅस्पिटल, कोल्हापूर येथे आपली वैद्यकीय सेवा प्रदान करत आहेत.
👍🏻 विशेषत डॉ प्रसाद तानवडे यांचे कॅन्सरवरील अनेक जनजागृती पर अभ्यासपूर्ण लेख विविध वृत्तपत्रात प्रकाशित झाले आहेत. त्याचा फायदा अनेकांना झाला आहे.
👉 विशेषत सामान्य, गोरगरीब रुग्णांना आपुलकीने चौकशी, योग्य सल्ला , उपचार आणि शासकीय सवलती मिळवून देण्यासाठी सदैव अग्रेसर असतात.
तसेच डॉ प्रसाद काशिनाथ तानवडे यांच्या पत्नी सौ आरती प्रसाद तानवडे (BCA, MBA, PGDHHM) यासुद्धा कियोट हाॅस्पिटल, कोल्हापूर येथे जनरल मॅनेजर पदावर मागिल ८ वर्षांपासून कार्यरत असुन गोरगरीब रुग्णांची सेवा करत आहेत.
अश्या सेवाभावी वृत्तीमुळे डॉ प्रसाद तानवडे हे रुग्णांचे आवडते डाॅक्टर म्हणून सुपरिचित आहेत.
अश्या लाडक्या रुग्णप्रिय डॉ प्रसाद काशिनाथ तानवडे यांचा सामाजिक आणि रुग्णसेवेचा वैद्यकीय क्षेत्रातील आनंदी, उत्साही आणि यशस्वी प्रवासाचे कौतुक आणि शुभेच्छा मा श्री मदनजी दराडे सर (तालुका अध्यक्ष – भाजपा बार्शी ), मा श्री अरुणभाई तोडकर साहेब (सदस्य- जि प सोलापूर), जनसेवक आनंद मालक तानवडे (मा पक्षनेते- जि प सोलापूर) आणि श्री बसवराज कारभारी यांनी स्वगृही कोल्हापूर येथे केला आणि त्यांच्या भावी सामाजिक आणि रुग्णसेवेस शुभेच्छा दिल्या…
