जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी – बसव अभ्यासक शिवानंद गोगाव यांची निवड
जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी – बसव अभ्यासक शिवानंद गोगाव यांची निवड

सोलापूर शहर आणि महाराष्ट्र राज्य कमेटी निवडीबाबत* सकाळी 11 वाजता
“बसव केंद्र”
काडादी हॉस्पिटल,
२ रा मजला,
*बाळीवेस, सोलापुर* येथे बैठक बोलावण्यात आली होती.परमपुज्य कोर्णेश्वर अप्पाजींच्या दिव्य सानिध्यात व केंद्रीय निरीक्षक प्रभुलिंग महागावकर,कलबुर्गी,यांच्या उपस्थितीत, निमंत्रक राजशेखर तंबाखे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी बैठकीचे आयोजन केले होते.पूज्य कोर्णेश्वर अप्पाजींच्या अमृतहस्ते धर्मध्वजारोहण करुन , महात्मा बसवण्णा व बसवादी शरणांचे स्मरण करुन सदर बैठकीस प्रारंभ झाला.सदर बैठकीत सर्वसंमतीने राज्य कार्यकारिणी सदस्य , जिल्हा कमीटी व शहर कमीटी गठीत करण्यात आली.

सोलापूर जिल्हा कमीटी पुढीलप्रमाणे असेल –
〰️〰️〰️〰️〰️〰️

१) शिवानंद गोगाव – अध्यक्ष
२) शिवशरण गोविंदे – उपाध्यक्ष
३)शेखर सोड्डी उपाध्यक्ष
४)शिवराज कोटगी उपाध्यक्ष
५)बाबूराव पाटील उपाध्यक्ष
६)धोंडप्पा तोरणगी- जनरल सेक्रेटरी
७) विश्वजीत हेले उपसेक्रेटरी
८)नामदेव फुलारी- उपसेक्रेटरी
९)सोमशेखर कोनापुरे – उपसेक्रेटरी
१०)नागेश पडणूरे – उपसेक्रेटरी
११) डॉ भिमाशंकर सिंदगी – कॅशीयर

वरीलप्रमाणेच सोलापूर शहर कमीटी देखील गठीत करण्यात आली.
वरील निवडप्रक्रिया व्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी प्रदेशाध्यक्ष राजशेखर तंबाखे,कोल्हापूर,
राज्य सरचिटणीस बसवराज कणजे ,पुणे, राज्य कार्यकारिणी सदस्य विजय शेटे ,विजयकुमार हत्तूरे, मल्लिकार्जुन मुलगे,यांनी विशेष परिश्रम घेतले.
