माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहानिमित्त जनजागृती
श्री माधवराव पाटील महाविद्यालयात सोमवारी (ता. २४) रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० सप्ताहाचे उद्घाटन
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230727-WA0049-780x470.jpg)
माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहानिमित्त जनजागृती
मुरूम, ता. उमरगा, ता. २६ (प्रतिनिधी) :
येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात सोमवारी (ता. २४) रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. ता. २४ ते २९ या सप्ताहामध्ये विद्यार्थी आणि पालक यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची ओळख व्हावी यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. येणाऱ्या प्रत्येक दिवशी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० आधारित एका विषयावर तज्ञांचे सखोल मार्गदर्शन केले जात आहे. यावेळी उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, प्रा. डॉ. सतिश शेळके, रसायनशास्त्राचे विभागप्रमुख प्रा. राजकुमार रोहीकर उपस्थिती होते. उद्घाटन प्रसंगी प्राचार्य सपाटे म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. हे धोरण सर्वांनी समजून घेणे महत्त्वाचे असून या धोरणाचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. एनएपीचे समन्वयक डॉ. सुशील मठपती यांनी नवीन शैक्षणिक धोरणात झालेले बदल यावर मार्गदर्शन करुन चर्चा घडवून आणली. मंगळवारी (ता. २५) रोजी उपप्राचार्य डॉ. बिराजदार यांनी क्रीडीट सिस्टीम व पदवी अभ्यासक्रमाची रचना याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. एनएपीचे समन्वयक डॉ. सुजित मठकरी यांनी अकॅडमीक बँक ऑफ क्रिडिट आयडी तयार करणे यावर चित्रफीतद्वारे माहिती दिली. एबीसी आयडीचे महत्व व कार्य याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. यशस्वीतेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० उस्मानाबाद जिल्हा समितीचे सदस्य प्रा. डॉ. महेश मोटे, आयक्युएसीचे समन्वयक प्रा. डॉ. किरणसिंग राजपूत, डॉ. शिला स्वामी, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. सचिन राजमाने, प्रा. लखन पवार, प्रा. अजिंक्य राठोड यांनी पुढाकार घेतला. बहुसंख्येने महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील महाविद्यालयात आयोजित एनएपी धोरणाविषयी बोलताना अशोक सपाटे, सतिश शेळके, चंद्रकांत बिराजदार, राजकुमार रोहीकर, सुशील मठपती
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)