अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे राज्यातील धार्मिक क्षेत्रात आदर्शवत प्रा. शिवाजीराव सावंत
न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यास हे राज्यातील धार्मिक क्षेत्रात आदर्शवत असल्याचे मनोगत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांचे बंधू शिवसेना सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख अमोलबापू शिंदे, तालुका प्रमुख संजय देशमुख, सो.म.पा. माजी नगरसेवक उमेश नामद्याळ, योगेश पवार, विनोद मदने, उमेश पांढरे, सिद्धेश्वर हत्तुरे, धनराज हीळ्ळी, संजय ढेरे, बसवराज बिराजदार, हरिभाऊ चौगुले, धनंजय सुतार, मशाक मुजावर हे उपस्थित होते.

याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शरद भोसले, चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
