अक्कलकोट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कै.मं.शफी टिनवाला यांची नात डॉ.निखत इक्बाल तांबोळी हिने एमबीबीएस व एमएस ऑप्थोमोलॉजी (नेत्ररोग तज्ञ) परिक्षेत घवघवीत यश
अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव

*🔶अक्कलकोट,* दि.27 : *अक्कलकोट नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कै.मं.शफी टिनवाला यांची नात डॉ.निखत इक्बाल तांबोळी हिने एमबीबीएस व एमएस ऑप्थोमोलॉजी (नेत्ररोग तज्ञ) परिक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.*

डॉ.निखत तांबोळी हिने शालेय शिक्षण हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर, महाविद्यालयीन शिक्षण वालचंद महाविद्यालय सोलापूर, एमबीबीएस अश्विनी ग्रामीण कुंभारी, तर वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक येथे झाली आहे.

महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक येथे झालेल्या एम.एस. ऑप्थालॉजी परिक्षेत घवघवीत यश मिळविल्याबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्राचे माजी गृहराज्य मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, काँग्रेस शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक रईस टिनवाला, आई वाहेदा तांबोळी, आजी सलीमा टिनवाला, शाहेदा हुंडेकरी, खालेदा बागलकोटे, कन्नड साहित्य परिषद महाराष्ट्र घटकचे अध्यक्ष सोमशेखर जमशेट्टी डॉ.निखत तांबोळी हिचे अभिनंदन केले आहे.
