महिलांसाठी मुंबईत मोबाईल टॉयलेट
मुंबईत महिलांसाठी मोबाईल टॉयलेट सुरू करण्यात आले आहे. पालिकेचा पायलट प्रोजेक्ट सीएसएमटीला सुरू करण्यात आला असून यामुळे महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

महिलांसाठी मुंबईत मोबाईल टॉयलेट

मुंबई, दादासाहेब येंधे :

मुंबईत महिलांसाठी मोबाईल टॉयलेट सुरू करण्यात आले आहे. पालिकेचा पायलट प्रोजेक्ट सीएसएमटीला सुरू करण्यात आला असून यामुळे महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. सध्या एकाच ठिकाणी हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून त्याला मिळणारा प्रतिसाद बघून नंतर त्यात वाढ करण्यात येईल असेल पालिकेकडून सांगण्यात आले.
पालिकेच्या ए विभाग कार्यालयाकडून हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. एका मोठ्या बसला मॉडीफाय करून त्याला महिला टॉयलेटचे रूप देण्यात आले आहे. पालिकेने मधुमिता फाउंडेशनच्या माध्यमातून सीएसएमटी येथील बेस्ट बस आगारामध्ये हा प्रकल्प सुरू केला आहे. प्रतिसाद बघून त्यात वाढ केली जाईल असे मधुमिता फाउंडेशनच्या मुंबई व्यवस्थापक स्नेहा पांचाळ यांनी सांगितले.
मोठ्या आकाराच्या बसमध्ये ‘ती’ नावाचे हे महिलांसाठीचे शौचालय सुरू करण्यात आले आहे. चार सीट, एक कमोड बसवण्यात आले आहे. याशिवाय दोन वॉश बेसिन देखील आहेत.
