*कोणताही अभ्यासक्रम निवडण्याचे विद्यार्थ्यांना स्वतंत्र…. डॉ. प्रतापसिंग राजपूत
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० सप्ताह साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आज तिसऱ्या दिवशी महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230728-WA0039-653x470.jpg)
कोणताही अभ्यासक्रम निवडण्याचे विद्यार्थ्यांना स्वतंत्र…. डॉ. प्रतापसिंग राजपूत
मुरूम, ता. उमरगा, ता. २८ (प्रतिनिधी) :
येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० सप्ताह साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आज तिसऱ्या दिवशी महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकत पदवी अभ्यासक्रमाची रचना आणि मल्टिपल एन्ट्री व एक्सिटचा पर्याय यावर सखोल माहिती दिली. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना असंख्य पर्यायातून योग्य मार्ग निवडण्याचे स्वतंत्र मिळेल, असे मत प्रकट केले. याप्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० उस्मानाबाद जिल्हा समितीचे सदस्य प्रा. डॉ.महेश मोटे हे उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील संभाव्य अडचणी याविषयी मार्गदर्शन केले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. याप्रसंगी नॅक समन्वयक प्रा. डॉ. विनायक रासुरे, प्रा. अशोक बावगे, डॉ. सोमनाथ बिराजदार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एनइपीचे समन्वयक डॉ. सुशील मठपती तर आभार डॉ. सुजित मठकरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. अप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. राम बजगिरे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, प्रा. अजिंक्य राठोड पुढाकार घेतला. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित व्याख्याना प्रसंगी डॉ. प्रतापसिंग राजपूत बोलताना डॉ. अशोक सपाटे, डॉ. विनायक रासुरे व अन्य.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)