Solapur: शेळके प्रशालेतील १९८९ बॅचच्या विद्यार्थ्यांचा तब्बल ३५ वर्षांनी ‘गेट टूगेदर’ उत्साहात

सोलापूर (प्रतिनिधी): जवळपास वयाची पन्नासी ओलांडलेले सर्व मित्र- मैत्रिणी पोहोचले होते.एकमेंकांना बघून ते आनंदाने भारावून गेले. प्रत्येकाने आपल्या आठवणींना उजाळा दिला.शाळेतील आठवणी नेहमीच हव्याहाव्याशा वाटतात. मात्र शिक्षणाचे पुरेसे धडे घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आपल्या कामाधंद्यामध्ये व्यस्त होतो. नवनवीन मित्र-मैत्रिणी आयुष्यात येत असतात. मात्र शाळेतील मित्र आणि त्याच्या सोबतचे क्षण हे विसरता येत नाहीत. नेहमीच आपण आपल्या शाळेतील आठवणी एकमेकांशी शेअर करत असतो. अशाच शालेय मित्रांनी एकत्र येऊन, स्नेहसंमेलन साजरे करून आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देण्याची कल्पना किती सुंदर असते हे वागदरी येथील शेळके प्रशालेच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात पहायला मिळाले आहे. श्री एस एस शेळके प्रशाला वागदरी 35 वर्षांनी पुन्हा भेट झाली 1989 बॅचचे विद्यार्थी स्नेह मेळावा नुकताच वळसंग वाडा वळसंग येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकर जावळे माजी मुख्याध्यापक व सध्याचे मुख्याध्यापक अनिल देशमुख व इतर गुरुवर्य हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले

सर्व वर्गमित्रातर्फे सर्व शिक्षकांचे सत्कार व शिक्षकातर्फे विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमचे अध्यक्ष व आजी मुख्याध्यापक यांनी आपल्या मनोगतातून कौतुक केले त्यानंतर जेवणाचा आस्वाद घेण्यात आला सर्व जेवणाचा खर्च श्री शांतलिंग नंदगी वागदरी यांनी दिले जेवणानंतर विद्यार्थी परिचय गप्पागोष्टी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .या कार्यक्रमास आलूरे सर, सुतार सर, कलशेट्टी सर, प्रधान सर, कांबळे सर ,पोतदार सर ,लंगोटी सर, काटगाव सर यमाजी सर कोथिंबीर मॅडम बागवान सर रणबिरे सर ,स्वामी सर, ढवणे सर ,शिक्षकेतर कर्मचारी स्वामी विज्ञान परिचर ढवणे ज्येष्ठ लिपिक ,वळसंग ,मुंदिनकेरी पोमाजी,बंदीछोडे. उपस्थित होते.

यावेळी मोनेश्वर सुतार ,शंकर चोळ्ळे, शांतलिंग नंदर्गी, सुरेश दणुरे ,तोरप्पा चव्हाण, शांतलिंग स्वामी, इराया स्वामी , चिदानंद बाबा, धानप्पा जावळकोटे,चंद्रशेखर चितली , रवी भिमपुरे, सुभाष शिरगण, शेखर सलगरे नागेश कवचे , रवि खसगी, स्वामीनाथ ब्रुहाणपुरे, काशिनाथ कलबुर्गी, बसवराज कलबुर्गी ,सिद्धाराम खुने , दत्ता कांबळे ,राजेंद्र फुलमाळी ,शिवानंद फुलमाळी ,दत्ता माळी, चांद पटेल , राजू कोल्हे, अर्जुन बनसोडे, शिवानंद चोळ्ळे ,गुरुपादप्पा नन्ना, राजकुमार सोनकवडे, संतोष कलबुर्गी ,परमेश्वर ममदापुरे ,राजू तोळणुरे ,पुन्नप्पा माळी , अफसर मुरडी ,शशिकांत लगशेट्टी, बिराजदार रसीद, सिद्धाराम कुंभार, सिद्धाराम सुतार ,परमेश्वर पगडे, शिवानंद किवडे ,मिरा गुमास्ते , सुरेखा अंबलगी ,अंजली माळगे,शशिकला हिरके, रेणुका खराडे,संगीता धड्डे, सुनिता नंदे, मलम्मा मलाबादे ,राजअहमद बागवान, आयुब शेख ,शाबोद्दीन नदाफ बाबु बरगाले ,मल्लु आष्टगी गुरप्पा बिराजदार हत्तीकणबस आदि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
