जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडी येथे विद्यार्थ्यांना वाचनासाठी वर्तमानपत्र भेट..वर्तमानपत्र शाळेत.. जग आले हातात
शाळा व्यवस्थापन समिती चे विद्यमान अध्यक्ष श्री गौरीशंकर दोड्याळे यांनी स्वखर्चाने रू.3000/- किंमतीचे वर्तमानपत्र स्टँड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडी येथे विद्यार्थ्यांना वाचनासाठी वर्तमानपत्र भेट देण्यात आले. *शाळा व्यवस्थापन समिती चे विद्यमान अध्यक्ष श्री गौरीशंकर दोड्याळे* यांनी स्वखर्चाने रू.3000/- किंमतीचे वर्तमानपत्र स्टँड व दररोज एक वर्तमानपत्र शाळेच्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिले . यामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील घडामोडी, जगाच्या कानाकोपऱ्यातील बातम्या समजणार आहेत.यासोबतच या वर्तमानपत्र स्टँड मध्ये विविध वाचनीय पुस्तके, मासिके यांचीही सोय करण्यात आली आहे. यापूर्वी अध्यक्ष श्री गौरीशंकर दोड्याळे यांनी रू 6000/- किंमतीचेएकूण 9 डिजिटल फलक प्रत्येक वर्गात बसवून दिले आहेत.या स्टँडच्या उद्घाटनप्रसंगी उपाध्यक्ष करीम नदाफ ,मुख्याध्यापक शिवशरण गोविंदे सर,सहशिक्षिका कडलासकर मॅडम,तुकाराम जाधव सर,सर्व विद्यार्थी उपस्थित होते.*सदरचे वर्तमानपत्र स्टँड अक्कलकोट वरून *श्री विश्वनाथ दसाडे यांनी शाळेपर्यंत मोफत पोहोच केले.. त्यांचे शाळेच्या वतीने हार्दिक आभार