अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे स्वामी भक्तांच्या सेवेतील यंत्रणा, गुणवत्ता आणि विकासाचा वेग व व्यवस्थापनातील कौशल्य, त्याला स्वामी भक्तांच्या संवादाची जोड आणि कार्याचा उरक, यामुळेच अन्नछत्राचे नांव लौकिक ,–मधुमेह तज्ञ डॉ.भास्कर हर्षे
श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,


अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे स्वामी भक्तांच्या सेवेतील यंत्रणा, गुणवत्ता आणि विकासाचा वेग व व्यवस्थापनातील कौशल्य, त्याला स्वामी भक्तांच्या संवादाची जोड आणि कार्याचा उरक, यामुळेच अन्नछत्राचे नांव लौकिक ,–मधुमेह तज्ञ डॉ.भास्कर हर्षे

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे स्वामी भक्तांच्या सेवेतील यंत्रणा, गुणवत्ता आणि विकासाचा वेग व व्यवस्थापनातील कौशल्य, त्याला स्वामी भक्तांच्या संवादाची जोड आणि कार्याचा उरक, यामुळेच अन्नछत्राचे नांव लौकिक होत असल्याचे मनोगत प्रसिध्द मधुमेह तज्ञ डॉ.भास्कर हर्षे पुणे यांनी व्यक्त केले.*

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

याबरोबरच डिजिटल प्रोट्रेट विश्व विक्रमविर प्रणव सातभाई नाशिक व मंगळूर पोर्ट येथील अमृत मुगळी यांचा देखील मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, आनंद खजुरीगीकर, स्वामींनाथ गुरव, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शरद भोसले, चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.