श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली असून स्वादिष्ठ व मन तृप्त करणारे आहे ; दिग्दर्शक मधुर भांडारकर
न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मुर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली असून स्वादिष्ठ व मन तृप्त करणारे आहे ; दिग्दर्शक मधुर भांडारकर

न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मुर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाची वाटचाल तेजस्वी असून न्यासाच्या परिसरात आलेला भक्त सुरु असलेल्या स्वामी कार्याने भारावून जात आहे, महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली असून स्वादिष्ठ व मन तृप्त करणारे असल्याचे मनोगत ख्यातनाम दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी व्यक्त केले.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मुर्ती, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी त्यांच्या सामवेत आलेले अशोक पंडित, अत्तीम महेश्वरी यांचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, सौरभ मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, युवराज सोनटक्के, निखिल पाटील, बाळासाहेब पोळ, एस.के. स्वामी, शावरेप्पा माणकोजी, सिद्धाराम कल्याणी, महादेव अनगले, धनप्पा उमदी, मल्लिकार्जुन बिराजदार, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, श्रीनिवास गवंडी, प्रसन्ना बिराजदार, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, अनिल बिराजदार, मल्लिनाथ कोगनुरे, लाला निंबाळकर, कल्याण देशमुख यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
