ग्रामीण घडामोडी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश अखेर मुरुम शहरातील मुख्य रस्यावरील खड्डे बुजवले

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश अखेर मुरुम शहरातील मुख्य रस्यावरील खड्डे बुजवले

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश अखेर मुरुम शहरातील मुख्य रस्यावरील खड्डे बुजवले

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    


मुरूम, ता. उमरगा, ता. ५ (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुतर्फा पडलेले मोठे खड्डे नगरपरिषदेच्या वतीने बुजवण्यात आले आहे. त्यामुळे वाहतुकीस काहीसा दिलासा मिळाला आहे. यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. शहरातील शिवाजी महाराज चौक ते बसवेश्वर चौक या मुख्य रस्त्यावर दुतर्फा ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली होती. वाहनचालकांनाही खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. तर पायी चालत जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत असे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नव्हती. शहरांतील नागरीक तसेच दररोज प्रवास करणारे वाहनचालक याबाबत नाराजी व्यक्त करत होते. रस्त्यावरील खड्डे लवकरात-लवकर बुजवण्यात यावेत व शहरवासीयांना दिलासा मिळावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल. अशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सातत्याने पाठपुरावा करत मागणी केली होती. याचे गांभीर्य लक्षात घेऊन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन भुजबळ यांनी नगर परिषद प्रशासनाला आदेशित करून शहरांतील खड्डे बुजवण्यास सांगीतले. नगर परिषद प्रशासनाकडून मुख्य रस्त्यावरील दुतर्फा पडलेले मोठ-मोठे खड्डे बुजवण्यात आल्याने वाहनचालक व नागरिकांची गैरसोय दूर झाल्याने नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आभार व्यक्त करून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील मेन रोडवरील खड्डे नगर परिषद प्रशासनाकडून बुजवण्यात आल्यानंतर

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button