महाप्रसाद सेवेबरोबरच नियमित २५० श्रीक्षेत्र अक्कलकोट शहरातील निराधार, अंध, दिव्यांग यांना दोन वेळेचे जेवण घरपोच दिले जाते, हे दैवी काम ; अर्थतज्ञ व रिजर्व्ह बँकेचे आर्थिक सल्लागार विद्याधर अनास्कर
विद्याधर अनास्कर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व अन्नछत्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230809-WA0044-780x470.jpg)
महाप्रसाद सेवेबरोबरच नियमित २५० श्रीक्षेत्र अक्कलकोट शहरातील निराधार, अंध, दिव्यांग यांना दोन वेळेचे जेवण घरपोच दिले जाते, हे दैवी काम ; अर्थतज्ञ व रिजर्व्ह बँकेचे आर्थिक सल्लागार विद्याधर अनास्कर
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले न्यासाची कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे, दररोज महाप्रसाद सेवेबरोबरच नियमित २५० श्रीक्षेत्र अक्कलकोट शहरातील निराधार, अंध, दिव्यांग यांना दोन वेळेचे जेवण घरपोच दिले जाते, हे दैवी कामच असून, नव्याने बांधण्यात येणारे अन्नछत्र भवन भव्य तरच होईलच, त्या माध्यमातून घडणारी ईश्वर सेवा महत्वाची असल्याचे मनोगत अर्थतज्ञ व रिजर्व्ह बँकेचे आर्थिक सल्लागार, शिखर तथा महाराष्ट्र राज्य शहकरी बँकेचे प्रशासक व विद्या सहकारी बँक लि. पुणेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
त्यांच्या समवेत पत्नी लिना अनास्कर, किरण कुलकर्णी, पूजा कुलकर्णी, सिमा बंगाळे, प्रकाश पाटील, निखील रणदिवे हे उपस्थित होते. याप्रसंगी यांचा देखील न्यासाच्य वतीने सत्कार करण्यात आला. अर्थतज्ञ विद्याधर अनास्कर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले, न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व अन्नछत्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, नामा भोसले, दत्ता माने, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शरद भोसले, संभाजीराव पवार, चंद्रकांत हिबारे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)