जि.प.शाळा, ग्रामपंचायत व रेवणसिध्देश्वर सार्वजनिक वाचनालय चपळगाववाडी यांच्या वतीने क्रांती दिनाच्या निमित्ताने भारतीय क्रांतिकारक व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन
ऐतिहासिक पुस्तकाचा ग्रंथ प्रदर्शन आयोजन

जि.प.शाळा, ग्रामपंचायत व रेवणसिध्देश्वर सार्वजनिक वाचनालय चपळगाववाडी यांच्या वतीने क्रांती दिनाच्या निमित्ताने भारतीय क्रांतिकारक व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन


ऐतिहासिक पुस्तकाचा ग्रंथ प्रदर्शन आयोजन

आज दि.9ऑगस्ट 2023 भारतीय इतिहासातील क्रांती दिवस.. यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चपळगाववाडी, ग्रामपंचायत चपळगाववाडी व श्री रेवणसिध्देश्वर सार्वजनिक वाचनालय चपळगाववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांती दिनाच्या निमित्ताने भारतीय क्रांतिकारक व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रंथ प्रदर्शन करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील वीरांची माहिती उपलब्ध करून दिली. *मेरी मिट्टी मेरा अभिमान* या अंतर्गत गावातील पवित्र मातीच्या कलशाचे पूजन करण्यात आले. चले जाव चळवळीची माहिती सांगून आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे स्मरण ठेवावे असे सांगितले. यावेळी पंचप्रण प्रतिज्ञा घेण्यात आली.


यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री पंडीत परशेट्टी, जावेद नदाफ,प्रतिष्ठित नागरिक, श्री विरूपाक्षप्पा दोड्याळे, गौरीशंकर बेळ्ळे,राजेंद्र निंबाणे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गौरीशंकर दोड्याळे, ग्रामसेविका बबिता गायकवाड, मुख्याध्यापक श्री शिवशरण गोविंदे, कडलासकर मॅडम, तुकाराम जाधव सर ,सर्व विद्यार्थी, पालक, व ग्रामस्थ उपस्थित होते.