महेश इंगळेंच्या व्यक्तीमत्वात भक्ती सेवा समर्पणाचे प्रतिबिंब – आदेश बांदेकर
आदेश बांदेकर यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

महेश इंगळेंच्या व्यक्तीमत्वात भक्ती सेवा समर्पणाचे प्रतिबिंब – आदेश बांदेकर

(प्रतिनिधी अक्कलकोट,

भक्ती, करुणा, दया, अस्मिता आत्मीयता ही पंचसुत्री श्री स्वामी समर्थांच्या अंतरंगात वसलेली खूप मोठी शक्ती आहे. यामुळे स्वामींच्या देहरुपी अवतार कार्यात त्यांचे अनेक भक्तगण उदयास आले. शेवटी येथील श्री वटवृक्ष मंदिरातील वटवृक्ष खाली त्यांनी निवास करून अनेक दिनदुबळ्यांच्या जीवनाचे कल्याण केले. त्यांच्या या अगम्य लिलांमुळे स्वामी समर्थांची माहिती जास्तीत जास्त भाविकांमध्ये प्रचलित झाली. स्वामींच्या महिमेचा, त्यांच्या कार्याचा, प्रचार प्रसाराचा जास्तीत जास्त विस्तार व्हावा, याकरीता येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर समिती नेहमीच प्रयत्नशील असते. अशा या पवित्र धार्मिक स्थळावर मंदिर समितीचा प्रमुख म्हणून काम करताना जीवनात अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. याचा कानमंत्र मंदिर समितीचे तत्कालीन चेअरमन कै. बाळासाहेब इंगळे यांनी विश्वस्त पदाधिकाऱ्यांना दिले आहे, म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच स्वामी सेवेचे व्रत जोपासलेले महेश इंगळे यांच्या व्यक्तिमत्त्वात भक्ती, सेवा, समर्पणाचे प्रतिबिंब दिसत असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध मराठी सिनेकलाकार आदेश बांदेकर यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आदेश बांदेकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी बांदेकर बोलत होते. पुढे बोलताना बांदेकर यांनी श्री स्वामी समर्थांनी समाधी घेऊन जवळपास आता १४५ वर्षे पूर्ण होत झाली आहेत. स्वामींच्या अवतार कार्यापासून आजपर्यंत येथे अनेक स्वामी भक्त वटवृक्ष मंदिरात स्वामी चरणी नतमस्तक झाले. मंदिर समितीकडून वेळोवेळी स्वामी भक्तांना सर्वोत्तम स्वामी सुविधा पुरविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न झाला व होत आहे. आता गेल्या अनेक वर्षापासून अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हाती मंदिर समितीचे सूत्रे आल्यानंतर मंदिर गाभारा परिसर नूतनीकरण, भव्य परिसर सुशोभीकरण, मंदिरातील स्वच्छता, स्वामी भक्तांना स्वामींचे दर्शन घेणे कामी होणारे सहकार्य या सर्व कार्यातून महेश इंगळे यांच्या कार्याची प्रचितीही येते असेही प्रतिपादन बांदेकर यांनी शेवटी व्यक्त केले. याप्रसंगी आदेश बांदेकर यांच्या समवेत असलेले महेंद्र कदम, मारुती शिंदे, सुशीलकुमार गंगावणे, कैलास तवळे, मल्हार साळवी, अभिषेक राणे, कुमार साळुंखे, नागेंद्र उपाध्याय, राजू गायकवाड, पूनम घुले, भाग्यश्री गायकवाड, सागर शिंदे, जितेंद्र घाग, प्रदीप घाग, दिलीप सिंग, राजेश नार्वेकर,
सतीश काळे, मिथिलेश साव, संदीप दळवी,
अवदुत कांबळे, संतोष राणे, श्रीरंग परळकर, दिनेश इंदे यांचाही महेश इंगळेंनी स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन सन्मान केला. यावेळी मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, शिवशरण अचलेर, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – आदेश बांदेकर यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
