महेश इंगळेंच्या सेवात्मक कार्यप्रणालीचे मूल्यमापन नाही – रमेशराव माने
रमेशराव माने यांचा सपत्नीक सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.

महेश इंगळेंच्या सेवात्मक कार्यप्रणालीचे मूल्यमापन नाही – रमेशराव माने

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१/८/२३)
(श्रीशैल गवंडी) – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानसाठी महेश इंगळे हे रात्रंदिवस स्वामीसेवा कार्य करीत आहेत. स्वामी सेवेचे व्रत जोपासल्याने स्वामी समर्थांनी त्यांना ही शक्ती दिलेली आहे. श्रद्धा, संयम, निष्ठा यांचा संयुक्त मिलाप त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेला आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानसाठी व स्वामी दर्शनाकरिता येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत सेवाभावी वृत्तीने ते नेहमी कार्यरत असतात. वटवृक्ष देवस्थानसाठी त्यांनी जे तळमळ दाखवून कार्य करत आहेत त्याचे वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. कारण त्यांची सेवा ‘भक्ती,श्रद्धा,संयम’ निष्ठेने परिपूर्ण आहे. अशी सेवा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व विश्वस्त समितीसाठी अमूल्य आहे. स्वामी सेवेसाठी व वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानसाठी त्यांनी आपले अमूल्य जीवन समर्पित केले आहे, म्हणून महेश इंगळे यांच्या सेवात्मक कार्य प्रणालीचे मूल्यमापन होऊ शकत नाही असे प्रतिपादन
कोल्हापूर जिल्ह्याच्या गगनबावड्यातील श्री गगनगिरी महाराज विश्वस्त समितीचे अध्यक्ष रमेशराव माने यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले असता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी त्यांचा स्वामींचे कृपावस्त्र, देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी रमेशराव माने बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, प्रसाद सोनार, स्वामीनाथ लोणारी, महेश मस्कले, श्रीकांत मलवे, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – रमेशराव माने यांचा सपत्नीक सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
