जिल्हा घडामोडी

महात्मा बसवेश्वर यांचे समतेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवा- प.पू.महानंदा माताजी मुगळीमठ

लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. समाजबांधवांनी लिंगायत तत्त्वे आत्मसात करून बसवण्णांनी स्थापन केलेल्या लिंगायत धर्माच्या तत्त्वांचा प्रसार करावा.निस्वार्थीपणे वागले पाहिजे,असे ज्येष्ठ साहित्यिक चेन्नवीर भद्रेश्वर मठ

महात्मा बसवेश्वर यांचे समतेचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवा- प.पू.महानंदा माताजी मुगळीमठ

सोलापूर- हत्तुरे वस्ती येथील मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात रविवारी झालेल्या जागतिक लिंगायत महासभेच्या बैठकीला संबोधित करताना मुगळी मठाचे (अक्कलकोट) मठाधिपती प.पू.महानंदा माताजी म्हणाले बाराव्या शतकात अनुभव मंडपाच्या माध्यमातून महात्मा बसवण्णा यांनी लोकशाहीचे मुल्ये या जगाला दिले.त्यांच्या विचारांच्या जागर करून समाजामध्ये समता, विश्वबंधुत्वता व दासोह हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवावे व एकजुटी अभावी लिंगायतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. देशाच्या विविध भागात विखुरलेल्या लिंगायतांना एकत्र करण्याचे काम सुरू ठेवावे तसेच
एकजुटीतून शासकीय सुविधांचा लाभ घेणे शक्य आहे.असे मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले जागतिक लिंगायत महासभेने लिंगायतांना एकत्र आणण्याचे आणि बसवादी शरणांचे विचार हृदयापर्यंत पोहोचवण्याचे काम केले पाहिजे,अशी सूचना त्यांनी केली.

प्रारंभी महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास हार घालून बसववंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मुगळी मठाचे मठाधिपती प.पू. महानंदा माताजी,अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे, राजश्री थळंगे,चेन्नवीर भद्रेश्वर मठ, जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, शहराध्यक्ष मयूर स्वामी, डॉ.भीमाशंकर सिंदगी आदी मान्यवर उपस्थित होते.

लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. समाजबांधवांनी लिंगायत तत्त्वे आत्मसात करून बसवण्णांनी स्थापन केलेल्या लिंगायत धर्माच्या तत्त्वांचा प्रसार करावा.निस्वार्थीपणे वागले पाहिजे,असे ज्येष्ठ साहित्यिक चेन्नवीर भद्रेश्वर मठ म्हणाले.

जगदज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे, हे स्वागतार्ह आहे. आगामी काळात लिंगायत समाजबांधवांच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


या कामासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन लिंगायत समाजाचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे दिले.
शंकरलिंग महिला मंडळाचे अध्यक्ष राजश्री थळंगे, प्रा.शिवलिंग अचलेरे , महासभेचे कोषाध्यक्ष डॉ.भीमा शंकर सिंदगी, तेली गुरुजी यांची भाषणे झाली. यावेळी नूतन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.जागतिक लिंगायत महासभेच्या बैठकीत
महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव म्हणाले की, तालुका कमिटी आणि महिलांसाठी हे स्वतंत्र युनिट तयार करणार आहे.
श्रावण महिन्यात विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या बैठकीस सोलापूर शहर मयुर स्वामी, उपाध्यक्ष शिवराज कोटगे, सचिव धोंडाप्पा तोरणगी, सहसचिव मृत्युंजय कल्याणी, सिद्दू कोरल्ली,नागेश पडनुरे, मीनाक्षी बागलकोटे,कविता हलकुडे,नागेश हत्तुरे,संजय तडलगी,डॉ.बसवराज नंदर्गी, नामदेव फुलारी,विवेक हत्तुरे,राजेंद्र फुलारी,राजेंद्र गवळी बी.डी.बिराजदार, चेन्नवीर स्वामी,राजशेखर हत्तुरे,सुरेश डबे,ओंकार हत्तुरे, केदार म्हमाणे,सिद्धार्थ हत्तुरे, सोमनाथ मकनापुरे,संदेश हत्तुरे,संतोष पाटील,राजेंद्र हौदे,नागेश धुम्मा,विश्वनाथ कल्लूरकर,संतोष वाले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button