श्रावण मांस विशेष

श्रावणमास निमित्ताने कुंभार गल्ली मधील श्री शांतलिंगेश्वर हिरेमठात मठाचे माजी मठाधिपती लिंगैक्य बालशिवयोगी श्री. ष. ब्र. गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चरित्रावरील पौराणिक पुराण कार्यक्रमात

श्रावणमासनिमित्ताने श्री शांतलिंगेश्वर हिरेमठात शेकडो सुहासिनीनां हळदी -कुंकू व ओटी भरण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

,दि.९-
श्रावणमास निमित्ताने कुंभार गल्ली मधील श्री शांतलिंगेश्वर हिरेमठात मठाचे माजी मठाधिपती लिंगैक्य बालशिवयोगी श्री. ष. ब्र. गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चरित्रावरील पौराणिक पुराण कार्यक्रमात खास महिलांसाठी श्री भाग्यवंती देवीच्या नावाने
“हळदी- कुंकू आणि सुहासिनींचा ओटी भरणे” समारंभ मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

हा सोहळा माजी मठाधिपती तथा श्रीक्षेत्र काशी विद्यापीठाचे वरिष्ठ प्रा. डॉ. श्री. लिंगैक्य श्रीपतीपंडिताराध्य महास्वामीजी यांच्या कृपाशीर्वादाने विद्यमान मठाधिपती श्री. ष. ब्र. जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात शहर परिसरातील सुमारे तीनशेहून अधिक महिलांना ओटी भरण्यात आले. प्रारंभी सकाळी अकरा वाजता श्री भाग्यवंती देवीची पूजा, नैवेद्य आरती करून जंगम समाजातील सुमारे १०१ सुहासिनींचा ओटी भरण्यात आले. वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी आपल्या विविध मंत्रोपच्चाराने पौरोहित्य केले.

HTML img Tag Simply Easy Learning    


या मंगलमय सोहळ्यात पुराणिक चन्नय्या स्वामी, गवई शिवानंद मडिवाळ व आझाद गल्लीतील श्री रेणुकाचार्य अक्कनबळग महिला मंडळाच्या वतीने लिंगैक्य बालशिवयोगी गुरुशांतलिंग महास्वामीजी व श्री भाग्यवंती देवीच्या चरित्रावरील एका पेक्षा एक भक्तिगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे आझाद गल्ली मधील वे. बसवराज शास्त्री यांचे सुपुत्र, अवघ्या दहा वर्षाचे बालकलाकार

HTML img Tag Simply Easy Learning    


गिरीश बसवराज स्वामी यानी भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नम्मम्मा नी सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा…,
ये भोळा शंकरा शंकरा ये भोळा शंकरा…., ओम् नमः शिवाय … हे तीन भक्तिगीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. शिवकुमार कट्टीसंगावी यांनी तबला साथ दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    


हा मंगलमय सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाची सांगता मंगलारतीने करण्यात आले. यावेळी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.

या सोहळ्यास संजय बाणेगांव ( चपळगांव), शिवानंद कुंभार ( सिंदगी), लोकमान्य सुपर बाजारचे संचालक सिध्दाराम टाके, विवेकानंद पतसंस्था चे शाखाधिकारी
चंद्रकांत दसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख
गुंडप्पा येळमेली,
गुरव समाजाचे प्रशांत गुरव, नारळाचे व्यापारी इरण्णा पाटील, रामचंद्र कडबगांवकर, खंडप्पा करकी,
माजी नगरसेविका भागुबाई कुंभार, ज्योती स्वामी, निर्मला स्वामी,
सुलोचना करकी,
राजश्री टाके, अलका दसले, मल्लम्मा कोळी, चंद्रकला हत्ते, श्रीदेवी गुरव, भारती कडबगांवकर, उज्ज्वला गुरव, सरोजा इंडे,
सुलोचना कडबगांवकर
व श्री शांतलिंगेश्वर हिरेमठ पुराण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगाबाई स्वामी, सुगलाबाई कुंभार, गंगाबाई कुंभार, अनिता कुंभार,
विजयालक्ष्मी कुंभार, जयश्री कुंभार, भाग्यश्री कुंभार, शोभा कुंभार, सविता कुंभार, रुपाली मणुरे,शिवम्मा स्वामी, महानंदा कुंभार आदींनी परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन कलप्पा सोमेश्वर व तात्यासाहेब समाने यांनी केले.

फोटो ओळ —
अक्कलकोट –
श्रावणमासनिमित्ताने श्री शांतलिंगेश्वर हिरेमठात शेकडो सुहासिनीनां हळदी -कुंकू व ओटी भरण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

चौकट —–
*स्वामी व कुंभार दाम्पत्यांतर्फे सेवा*
या अभूतपूर्व मंगलमय वातावरणातील हळदी- कुंकू, शेकडो सुहासिनीनां ओटी भरण्यासह महाप्रसाद वाटप ची सेवा ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवनिंगय्या स्वामी, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे संचालक चंद्रकांत स्वामी व सी. बी. खेडगी महाविद्यालयातील लिपिक तथा दैनिक संचार चे पत्रकार विरुपाक्ष कुंभार परिवार च्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button