अक्कलकोट येथे भक्तीपूर्ण वातावरणात अड्डपालखी सोहळा उत्साहात संपन्न
शेकडो भक्तगणांचा सहभाग

अक्कलकोट येथे भक्तीपूर्ण वातावरणात अड्डपालखी सोहळा उत्साहात संपन्न …


शेकडो भक्तगणांचा सहभाग

– ‘श्री गुरुशांतलिंगेश्वर महाराज की जय’ च्या जयघोषात
येथील श्री शांतलिंगेश्वर हिरेमठाच्यावतीने श्रावणमास समाप्ती निमित्ताने मठाधिपती श्री. ष. ब्र . जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची शहराच्या प्रमुख मार्गावरून भक्तीपूर्ण वातावरणात अड्डपालखीची भव्य व दिव्य सवाद्य
मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील हजारो भक्तगण सहभागी झाले होते.


श्रावणमास निमित्ताने लिंगैक्य गुरुशांतलिंग महास्वामीजी यांच्या चरित्रावरील वेदमूर्ती चन्नय्या शास्त्री यांच्या रसाळ वाणीने सुरू असलेल्या पुराणाची
समाप्ती निमित्ताने शहराच्या प्रमुख मार्गावरून अड्डपालखी मिरवणूक शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजता श्री शांतलिंगेश्वर हिरेमठापासून मार्गस्थ झाले. त्यानंतर देशमुख गल्ली, आझाद गल्ली, समाधी मठ,
ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान मार्गे विजय चौक, कारंजा चौक, मुख्य रस्ता, फत्तेसिंह चौक, टिळक गल्ली मार्गे
सायंकाळी सात वाजता मठात सांगता करण्यात आली.
यावेळी उपस्थित भक्तांनी दिलेल्या श्री शांतलिंगेश्वर महाराज की जय, गुरुशांतलिंग शिवाचार्य महाराज की जय, मानव धर्माचा विजय असो अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला. विविध रंगांच्या फुलांनी सुशोभित केलेल्या पालखी मिरवणूक चे स्वागत व दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.
या मिरवणूकीत प्रारंभी जलकुंभ घेतलेल्या १०८ सुवासिनी होत्या. त्यामागे श्रीक्षेत्र हिरेजेवरगीचे शांतलिंगेश्वर भजन मंडळ, ढोल संघ, व बँड पथक, सनईचा मधुर आवाज व जयजयकाराने सारे शहर दुमदुमून गेले होते.
शहर व परिसरातील पुरवंत मंडळ आपली कला प्रकारांचे सादरीकरण करत होते. त्यांचा मार्गावरील भक्तगण दर्शन घेऊन धन्य होत होते. मिरवणूक मार्गावर सहभागी जलकुंभधारी सुहासिनीनां व भक्तगणांना
ओम हार्डवेअर चे संचालक भिमाशंकर कुंभार परिवार च्या वतीने पाणी वाटप करण्यात आले.
सायंकाळी आयोजित धर्मसभेत महास्वामीजींचे आशिर्वचन झाले.
या सोहळ्यास
श्री विरभद्र शिवाचार्य (कडगंची ), श्री. शिवशंकर शिवाचार्य ( तोळणूर), श्री. भोगलिंगेश्वर महास्वामीजी ( मुगळी), श्री. बसवलिंग महास्वामीजी, श्री. कैलासलिंग शिवाचार्य ( गौर),
शिवनिंग स्वामी, मल्लिनाथ स्वामी,
महेश हिंडोळे, रामचंद्र समाने, सुर्यकांत बिराजदार, प्रकाश उण्णद, प्रमोद पाटील, राजशेखर उंबराणीकर, कल्याणी पाटील,अमोल पाटील, वेदमूर्ती बसवराज शास्त्री, विश्वनाथ मालीपाटील, बाबुराव देसाई, इरय्या स्वामी, शंकरराव पाटील, अण्णाराव मुजगोंड, रामचंद्र कडबगांवकर, सुरेश जेवरगी, भिमाशंकर करकी, इरण्णा पाटील, बाबुराव बिराजदार,सिध्देश्वर कुंभार, शिवराज बिराजदार,
भिमाशंकर कुंभार, शरणप्पा कुंभार, शिवानंद कुंभार, गंगाधर कुंभार, मल्लिकार्जुन सोमेश्वर, हौदे, सुरेश पाटील, अनिल हत्ते, काशिनाथ याळवार
व हिरेजेवरगी, मणूर, अफजलपूर, माशाळ परिसरातील हजारो भक्तगण उपस्थित होते.
सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंभार गल्ली तरुण मंडळाचे कार्यकर्ते व भक्तगणांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तात्यासाहेब समाने व कलप्पा सोमेश्वर यांनी केले.
चौकट —-
हिरेमठात सालाबादप्रमाणे यंदाही श्रावणमास निमित्ताने पुराण सांगता निमित्त प्रसिद्ध व्यापारी एस .एस. (सुर्यकांत) बिराजदार परिवाराच्या वतीने खिरीचा महाप्रसाद वाटप करण्यात आले. दिवसभर महाप्रसादाचा सुमारे हजारो भाविकांनी लाभ घेतला.