*एम के फाऊंडेशन चे संस्थापक श्री महादेव कोगनुरे यांच्या वतीने औज ( आहेरवाडी) अपघातग्रस्त कुटुंबास मदत…*
एम के फाऊंडेशन चे सामाजिक बांधिलकी

*एम के फाऊंडेशन चे संस्थापक श्री महादेव कोगनुरे यांच्या वतीने औज ( आहेरवाडी) अपघातग्रस्त कुटुंबास मदत…*

औज ( आहेरवाडी) दक्षिण सोलापूर


दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील बस स्टॉप वर सिमेंट वाहतूक करणारा बल्कर अचानक पलटी झाल्याने घडलेल्या दुर्घटनेत त्याखाली चेंगरून औज गावातील विठ्ठल शिंगाडे (वय वर्षे 60), शालेय विद्यार्थी प्रज्ञा दोडतले (वय वर्षे 12), महेश इंगळे अंदाजे वय वर्षे 16, अनिल चौधरी (वय वर्षे 50) यांचा जागीच मृत्यू झाला. आज एम के फाऊंडेशन चे संस्थापक व सागर सिमेंट चे मुख्य व्यवस्थापक श्री महादेव कोगनुरे यांनी आज घटनास्थळी भेट देऊन मृत नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन केले व जखमींची विचारपूस केली.


“ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी कंपनीच्या कामानिमित्त मी परगावी होतो आणि सोलापूर मध्ये येताच घटनास्थळी जाऊन त्यांची परिस्थिती जाणून घेऊन दुर्घटनेत मृत झालेल्याच्या नातेवाईकांना व जखमींना फाऊंडेशन च्या वतीने समाजाप्रती आपले असलेली बांधिलकी जपत सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आर्थिक मदत करुन कर्तव्य पार पाडले, भेटीदरम्यान माता भगिनींचे अश्रू पाहून मन सुन्न झाले होते, अशी वेळ कोणावरहि येऊन अशी मी प्रार्थना करतो ” अश्या भावना यावेळी महादेव कोगनुरे आपल्या यांनी व्यक्त केल्या.
मनाला सुन्न करणारी ही घटना १ सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या दरम्यान घडली होती . सिमेंटचे बल्कर अतिशय वजनदार असल्याने सिमेंट बल्कर घटनास्थळावरून हटवण्यास फार वेळ लागला व मदत कार्य बऱ्याच वेळ सुरू राहिले व चिरडलेल्या निष्पाप जीवांना वाचवण्यात अपयश आले असे गावकरी भावुक होऊन सांगत होते.
यावेळी गावचे सरपंच श्री भारत रुपनर जी, माजी उपसरपंच श्री तम्मा दोडतले जी, ग्रामपंचायत सदस्य श्री पिराजी कोकरे जी, आहेरवाडी चे सरपंच श्री नरसप्पा आण्णा दिंडुरे जी, बंकलगी चे सरपंच श्री चंद्रशेखर सागरे जी, सागर सिमेंट चे सेल्स प्रमोटर श्री आनंद जी लोणावत, सागर सिमेंट चे डीलर श्री शिवलाल हारळेकर, सागर सिमेंट चे डीलर श्री मल्लेशी मंदोळी जी, डीलर श्री इसाक अत्तार जी, सागर सिमेंटचे विक्रेते श्री शिवराज हिरेमठ जी, श्री जगदीश जी नलवार, श्री आनंद चोल्ले जी, श्री एम के फाऊंडेशन यत्नाळ शाखा अध्यक्ष श्री हनुमंत दिंडुरे जी, श्री मौलाली शेख, श्री अंबादास रुपनर जी , श्री सुरेश कोकरे जी, श्री रेवनसिद्ध कोनदे मामा, श्री विनोद गावडे जी, श्री विठ्ठल दोडतले जी, शाखेचे सर्व पदाधीकारी,एम के फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, युवक वर्ग, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.