
*चपळगाव सेमी इंग्लिश स्कूल मध्ये सरस्वती महापूजा संपन्न!*
चपळगाव दि.21/03/2024
आज ग्रामीण विद्या विकास सेमी इंग्लिश स्कूल,चपळगाव येथे पर्यवेक्षक माने सर व CEO N M पाटील सर यांच्या हस्ते श्री सरस्वती देवीची प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी सेमी इंग्लिश स्कूल प्रमुख कु. गोविंदे मॅडम व दुलंगे सर उपस्थित होते
विध्यार्थ्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि सृजनशीलता वाढ व्हावी म्हणून ज्ञान व विद्येची देवता सरस्वती देवीची स्मरण आणि उपासना करतात.यावेळी वर्षभरात विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.सर्व विध्यार्थी विविध वेशभूषेत उपस्थित होते आणि त्यांच्यामध्ये भरपूर उत्साह व आनंद होता.
सर्व प्रथम अतिथिंचे स्वागत सुरवसे मॅडम यांनी केले.
प्रास्ताविकात गोविंदे मॅडम यांनी पहिल्या वर्षी नर्सरी ते इ 4 थी या 7 वर्गासाठी 200 पेक्षा जास्त विध्यार्थी संख्या म्हणजे येथील गुणवत्तापूर्ण शिक्षण,पालकांचे विश्वास,विद्यार्थी हित,सर्व प्रकारचे सोयी सुविधा,संस्था अध्यक्ष श्री. रविकांत पाटील साहेब व संस्था सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन,स्कूल प्रशासनाचे नियोजन आणि शिक्षिका वर्गांचे योगदान यामुळे शक्य झाले आहे.
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आले.यावेळी विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरवसे मॅडम यांनी केले तर आभार पट्टनशेट्टी मॅडम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षिका वर्ग आणि मदतनीस वर्ग यांचे सहकार्य लाभले.
