UPI payment: उद्या या वेळेत यूपीआय (UPI) पेमेंट करता येणार नाही; वाचा कारण…
दि.३, तुम्ही जर यूपीआयने पेमेंट करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार 4 ऑगस्ट 2024 (रविवार) रोजी यूपीआयने तुम्हाला पेमेंट करता येणार नाही. HDFC बँक ग्राहकांना 4 ऑगस्ट 2024 रोजी यूपीआयने पेमेंट करता येणार नाही.

याचा कारण म्हणजे शेड्यूल डाउनटाइम अलर्ट बँकेने जारी केला आहे. या कालावधीत, ऑनलाइन पेमेंट बंद केले जाईल, परंतु यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आली आहे.

बँक सूचना

बँकेने अधिसूचना जारी केली आहे. सकाळी 12:00 ते पहाटे 03:00 पर्यंत सिस्टम मेंटेनन्सचे काम केले जाईल आणि या दरम्यान सर्व ऑनलाइन पेमेंट बंद राहतील, असे सांगण्यात आले आहे. म्हणजे एकूण 180 मिनिटांसाठी असे पेमेंट थांबवले जाईल. याचा परिणाम सर्व खातेदारांवर होणार आहे. यामध्ये बचत आणि चालू खातेधारक दोन्ही व्यवहार करू शकणार नाहीत.


कोणत्या ॲप्सवर परिणाम होईल?
मात्र, याचा परिणाम सर्व ॲप्सवर होणार आहे. ज्याच्या मदतीने युजर्स UPI पेमेंट करतात. अधिसूचनेनुसार, तुम्ही HDFC मोबाइल बँकिंग ॲप, GPay, WhatsApp Pay, Paytm, Shriram Finance आणि Mobikwik वर पेमेंट करू शकणार नाही. म्हणजे एका अर्थाने सिस्टीम पूर्णपणे डाऊन होईल. परंतु पीओएसच्या मदतीने केलेल्या व्यवहारांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.