जिल्हा सहसंयोजक उपाध्यक्ष रवींद्र वाघमोडेंचा वटवृक्ष मंदिरात सन्मान
बीजेपीच्या जिल्हा सहसंयोजकपदी निवड झाल्याने महेश इंगळेंनी केला सन्मान
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१४/९/२३) –
भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हा पंचायतराज व ग्रामविकास विभाग जिल्हा सहसंयोजक उपाध्यक्षपदी रवींद्र वाघमोडे यांची नुकतीच निवड झाली. यानिमीत्ताने रवींद्र वाघमोडे यांनी सर्वप्रथम येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन व आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी रवींद्र वाघमोडेंचा स्वामींचे कृपावस्त्र,प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला व रवींद्र वाघमोडे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी बोलताना रवींद्र वाघमोडे यांनी आजपर्यंत जीवनात सामाजिक कार्य करण्याची आवड असल्याने नेहमीच अनेक समाजाभिमुख उपक्रमात माझा सहभाग असायचा, त्यामुळे आज स्वामी कृपेने भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर जिल्हा पंचायत राज व ग्रामविकास विभाग पदी आपली निवड झाली असल्याचे सांगत पक्षश्रेष्ठीकडून आपल्यावर टाकण्यात आलेला विश्वास व सोपविण्यात आलेली जबाबदारी-कार्यप्रणाली प्रामाणिकपणे पार पाडू. याकरिता स्वामी समर्थांचे आशीर्वाद व मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे मार्गदर्शन आपल्या पाठीशी असणे गरजेचे असल्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन आपण स्वामी समर्थांचे दर्शन घेतले असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, चंद्रकांत सोनटक्के, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, ऋषिकेश लोणारी, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – रवींद्र वाघमोडे यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
More Stories
Akkalkot : अक्कलकोटकरांची सांज ठरली अविस्मरणीय ; लोकगीत कधीच संपणार नाही, विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमालेत निर्माते स्वप्नील रास्ते यांचे मनोगत
Akkalkot: स्वामींच्या वास्तव्यामुळे वटवृक्ष मंदीराचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय – आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे
Akkalkot: नाताळच्या सुट्टीमुळे अन्नछत्रात झालेल्या गर्दीचा न्यासाकडून योग्य नियोजन ; स्वामीभक्तांनी व्यक्त केल्या भावना