आमरस पार्टीचा आस्वाद घेत ;आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
हन्नुर येथील अनंत चैतन्य प्रशालेचे दहावी बॅचचा मेळावा संपन्न

आमरस पार्टीचा आस्वाद घेत ;आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा
हन्नुर येथील अनंत चैतन्य प्रशालेचे दहावी बॅचचा मेळावा संपन्न
पुणे — जय मल्हार कृषी पर्यटन, मोराची चिंचोली.तालुका शिरूर,जिल्हा पुणे येथे एकदिवसीय सहल आयोजित करण्यात आलेली होती.
हा दिवस सर्वांच्या खूप दिवसाच्या भेटीने अविस्मरणीय ठरला.यावेळी शालेय जीवनातील आठवणीना उजाळा देण्यात आले.ज्या शाळेतून घडून आपण मोठे झालेले आहोत,त्या शाळेकरीता येणाऱ्या काळात योगदान देण्याचे ठरले.
तदनंतर वॉटर पार्क,आमरस पार्टी,कृषी पर्यटन यांचा आनंद घेण्यात आले.यांचे सुंदर नियोजन
योगेश काळे,उमेश बावकर,अजित कांबळे, कृष्णा जैनजांगडे यांनी केले होते. सतिश बाळशंकर, रवी स्वामी शकील जमादार, गिरमला वाले यांनी सर्वांना एकत्र करून खारीचा वाटा उचलला . दाऊद पठाण यांनी आर्थिक मदत केली. यावेळी प्रविण बोकडे, मडोळप्पा भरमशेट्टी,वैजीनाथ बिराजदार,खाजेभाई खुजादे, अकबर सगरी इत्यादी उपस्थित होते.
सचिन किरणळी,पांडुरंग घोडके,संजय हेगडे, सादीक मकानदार, इम्रान जमादार यांच्या सह सर्व मित्रांची कमतरता भासत होती.सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार परशुराम पुटगे यांनी मांडले.सहलीचा समारोप गंधर्व हॉटेल,(बालगंधर्व पुणे )येथे भोजन करून करण्यात आले.सदरील कार्यक्रम अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.
