स्वामींच्या नामस्मरणाला जीवनात अग्रस्थान – आ.कमल ढोले-पाटील
आमदार कमल ढोले-पाटील यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231011-WA0051-780x470.jpg)
स्वामींच्या नामस्मरणाला जीवनात अग्रस्थान – आ.कमल ढोले-पाटील
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट-श्रीशैल गवंडी) दि.११/१०/२३) – श्री स्वामींनी जो उपदेश केला त्यात नामस्मरणाला सर्वाधिक महत्त्व दिले. अनन्यभावाने माझी सेवा कर, मी तुझा योगक्षेम चालवेन या गीतोक्ती पुनरुच्चार करून स्वामींनी नामस्मरणाची अखंड माळ (नामजप, नामतप, नामयोग) भक्ती चालू ठेवावी हाच महाबोध सांगितला आहे. स्मरणसातत्यातच अस्तित्वाची प्रचिती असते. ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ हे त्यांचे आश्वासनही नामजप करताक्षणी तुझ्या सन्मुख आहे हेच भक्तितत्त्व सांगते. ‘वडाच्या पारंब्या तुम्ही धरून बसा’ हे त्यांनी का बरे सांगितले असावे? तर या सांगण्यातील मथितार्थ असा की, वड हे अखंडत्वाचे प्रतीक आहे. हे झाड वाढते, मोठे होते, विस्तारते. त्यास अनेक पारंब्या फुटतात. त्या पुन्हा जमिनीत रुजतात. त्याचा पुन्हा वृक्ष होतो. ही अखंडत्वाची खूण श्री स्वामींनी सांगितली असावी. सद्गुरूंकडून नामोपदेश मिळून सबीज/दिव्य/संजीवन अशा नामाचे बीज साधकाच्या अंत:करणात रुजते. ते वाढते. विस्तारते. ते नामोच्चाराच्या सातत्याने, म्हणून श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाला आमच्या जीवनात अग्रस्थान असल्याचे प्रतिपादन पुण्याचे आमदार कमल ढोले- पाटील यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी कमल ढोले- पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना आमदार ढोले-पाटील यांनी महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचा चेहरा मोहरा बदललेला आहे. भाविकांना वटवृक्ष मंदिरात आध्यात्मिक वातावरण निर्मिती करून देऊन स्वामी भक्तांच्या भक्तीतून वातावरण भक्तीमय केलेले आहे. हे पाहून खूप समाधान वाटत आहे असेही मनोगत आ.ढोले-पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, विपुल जाधव, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे आदिसह भाविक भक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – आमदार कमल ढोले-पाटील यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)