गावगाथाठळक बातम्या

Rajyasabha : Breaking | राज्यसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार बिनविरोध

मुंबई (प्रतिनिधी): उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. आज दुपारी 3 पर्यंत राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती मात्र दुपारी 3 पर्यंत राज्यसभेसाठी कोणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. याबद्दल मी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा आभार मानते. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या संधीचे मी सोनं करेन असे ते म्हणाले.

सुनेत्रा पवार पुढे म्हणाले, महायुतीच्या सर्व नेत्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. छगन भुजबळ देखील फॉर्म भरायला होते त्यामुळे कोणीही नाराज नाही. लोकसभेवर जावे ही जनतेची मागणी होती तर राज्यसभेवर जावे अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. सर्व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार राज्यसभेची उमेदवारी तुम्हीच घेतली पाहिजे असे पार्थ पवार यांनी स्वत: सांगितले होते. त्यांचा देखील हा आग्रह होता असेही सुनेत्रा पवार म्हणाले.

तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीमधील एकही नेता उपस्थित न राहिल्याने महायुतीत अजित पवार एकटे पडले का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. यामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु आहे.

राज्यसभेसाठी मंत्री छगन भुजबळ, बाबा सिद्दीकी, पार्थ पवार आणि आनंद परांजपे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button